🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

"देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र " या फेसबुक वरील खोटी व चुकीचा पोष्ट विरोधात पोलिसात तक्रार. #Chandrapur

🟥
खासदार बाळू धानोरकर यांच्या भाषणाच्या विपर्यास केल्याचे खपवून घेणार नाही.

वरोरा शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष विलास टिपले यांची पोलिसात धाव.
चंद्रपूर:- महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी काल लोकसभेत १२७ व्या घटना दुरुस्तीबाबत चर्चेत काँग्रेस पक्षातर्फे सहभाग घेतला होता. या घटना दुरुस्तीला समर्थन दिले. परंतु तो व्हिडीओ अर्धवट "देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र" या फेसबुक पेजवरून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका काँग्रेसची संसदेत मागणी या ठळक मथळ्याखाली पोस्ट करण्यात आली. हि पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. त्या विरोधात आज वरोरा शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष विलास टिपले यांनी पोलिसात धाव घेत या पेजविरोधात तक्रार दाखल केली आहे. #Chandrapur
        🟥
              महत्वाची बाब म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी सदर व्हिडीओ मध्ये कुठेच म्हंटले नाही. काँग्रेस पक्ष व खासदार बाळू धानोरकर मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत नेहमी आग्रही असतात. मराठा आरक्षणाला पूरक अशा घटना दुरुस्तीचे खासदार बाळू धानोरकर यांनी समर्थन केले असतांना त्याबाबत सपशेल खोटी माहिती पसरवून त्यांची बदनामी करण्याच्या प्रयत्न या फेसबुक पोस्टवरून होत आहे. 
                   🟥
           भारतीय जनता पक्षाची खोट बोल पण रेटून बोल अशी विचारधारा राहिली आहे. त्या विचार धारे प्रमाणे महाराष्ट्रातील लोकप्रिय काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या विरोधात खोटी बदनामकारक पोस्ट टाकण्यात आली आहे. त्यासोबतच खासदार बाळू धानोरकर यांच्याबाबत मराठा समाजबांधवांची तेढ निर्माण करून भावना भडकविण्याचा प्रयत्न या फेसबुक पोस्ट वरून होत आहे. 
            🟥
          हि पोस्ट फेसबुक वरून काढण्यासाठी आज अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना तक्रार देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  यावेळी वरोरा शहर काँग्रेस अध्यक्ष विलास टिपले, नगरसेवक राजू महाजन, वरोरा शहर काँग्रेस सचिव मनोहर स्वामी यांची उपस्थिती होती. 🟥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत