🙏


🙏✍️

उभरत युवा नेतृत्व भाजप युवा मोर्चाने कायमच गमावल - विशाल निंबाळकर #Condolence #message(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- कमी वयात समाजकार्य करण्याच्या उद्देशाने राजकणात आलेल्या अक्षयने भाजपयुवा मोर्चाच्या माध्यमातून अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. मात्र इतक्या कमी वयातच तो अनपेक्षित पणे आम्हच्यातून निघून गेला त्याच्या जाण्याने भाजप युवा मोर्च्याने एक उभरत नेतृत्व कायमच गमावलं असल्याची शोकसवेदना अक्षय खांडेकर यांच्या निधनानंतर भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विशाल निंबाळकर यांनी व्यक्त केली.#Adharnewsnetwork
अक्षय हा अतिशय शांत स्वभावाचा होता. तो पक्षाने दिलेले जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडायचा. त्यामुळे पक्षानेही त्याला अनेक जबाबदाऱ्या दिल्या होत्या. तो जितका चांगला कार्यकर्ता होता. तितकाच चांगला मुलगा सुद्धा होता. मात्र वयाच्या 27 वर्षी दुर्धर आजाराने त्याला ग्रासले. त्याच्या जाण्याची बातमी अत्यंत वेदनादायी असून त्याच्या जाण्याने भाजपयुवा मोर्चाचे मोठे नुकसान झाले आहे. या दुःखातून खांडेकर कुटूंबियांना माता महाकाली सावरण्याचे बळ देवो हीच प्रार्थना करतो असे विशाल निंबाळकर यांनी आपल्या शोकसंदेशातून म्हटले आहे.#Condolence #message

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत