🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

पोलिस निरीक्षक सुनिल सिंग पवार आणि जेष्ठ नागरिक यांच्यात शहरातील विविध समस्यांवर चर्चा. #Discussion(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनीधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी पोलीस स्टेशन भद्रावती येथे जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन आणि शहरातील विविध समस्या जाणुन घेण्यासाठी सामुहिक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.#Adharnewsnetwork
चर्चेसाठी भद्रावती शहरातील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता.
सर्व प्रथम पोलिस निरीक्षक सुनिल सिंग पवार साहेब यांचे स्वागत माधवराव कौरासे यांनी पुस्तक भेटवस्तु देऊन केले. सोबत लताताई टिपले यांनी सुध्दा पुष्प देऊन पवार साहेब यांचे स्वागत केले.
सध्या वाढत असलेल्या सायबर क्राईम, बँक फ्रॉड, लॉटरी अशा प्रमुख विषयाकडे लक्ष घालुन पवार साहेब यांनी सर्व जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. मोबाईल वर येणा-या अशा फसव्या कॉल पासुन सावध राहाण्याचे आवाहन केले.
ग्राहक पंचायत भद्रावतीचे कार्याध्यक्ष वामन नामपल्लीवार यांनी भद्रावती शहरात लागलेल्या सी.सी.टि.व्ही कॅमेराबद्दल माहीती विचारली. तेव्हा पोलीस विभागाचे ४६ सी.सी.टि.व्ही कॅमेरा शहरात लागले आहे आणि ते सगळेच्या सगळे सूस्थितीत आहे. शिवाय त्यांची मॉनिटरिंग व्यवस्थित होत आहे. असे पवार साहेब यांनी माहीती दिली.
जेष्ठ नागरिकांच्या मागण्या :
पोलिस स्टेशन मध्ये येणा-या नागरिकांसोबत मैत्रीपुर्ण वागणुक मिळावी. रस्त्याच्या कडेला तसेच भद्रावती शहरात अनाथ गतिमंद वृध्द व्यक्तिंना वृध्दाश्रमात सोडावे. शहरातील तरूण मुलं भरधाव वेगाने मोटार सायकल पळवतात तसेच गाड्यांचे सायलेंसर बदलुन कर्णकर्कश आवाज करत गाड्या चालवतात. अशा मोटार सायकल चालकावर लवकरात लवकर कार्यवाही करावी. अशा अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली.

Domestic Violence (घरगुती हिंसा) या विषयावर लताताई टिपले यांनी चर्चा केली. या विषयावर पवार साहेब यांनी संपूर्ण माहीती दिली. ग्राहक पंचायत भद्रावती चे सह सचिव प्रविण चिमुरकर यांनी शहरातील प्रत्येक नागरिकांना जागरूक रहा, आपल्या सभोवताल घडणा-या अनुचित घटनांची माहीती पोलिस विभागाला द्यावी, त्याविरूध्द आवाज उठवावा. मानवी समाजाला मजबूत आणि सुरक्षित दिशेकडे नेण्यास मदत करावी. असे आवाहन केले.
पोलिस निरीक्षक सुनिल सिंग पवार यांचे शहरातील नागरिकांना आवाहन :
शहरातील सराफा लाईन येथे प्रत्येक दुकानदारांनी आपल्या दुकानाबाहेर रात्री लाईट सुरू ठेवावा. पालकांनी आपल्या तरूण मुला-मुलींकडे लक्ष देणे खुप गरजेचे आहे, त्यामुळे सध्या ज्या घटना घडत आहे त्याकडे दुर्लक्ष न करता सर्व पालकांनी स्वत: तरूण मुला-मुलींकडे लक्ष द्यावे. मोबाईल वर येणा-या लॉटरी, बँक कॉल सावधानी पुर्वक हाताळावे. असे आवाहन पोलिस निरीक्षक सुनिल सिंग पवार साहेब यांनी केले.

शेवटी कार्यक्रमाचा समारोप ग्राहक पंचायत भद्रावती चे कार्याध्यक्ष वामन नामपल्लीवार यांनी केला. नामपल्लीवार साहेब यानी चर्चा करण्यात आलेल्या सर्व समस्यांवर लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी विनंती केली आणि सर्व जेष्ठ नागरिक बोलावुन सन्मान दिला, समस्या ऐकून घेतल्या त्याबद्दल सर्व जेष्ठ नागरिकां तर्फे पोलिस निरीक्षक सुनिल सिंग पवार साहेब यांचे आभार मानले.#Discussion

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत