Top News

स्वातंत्र्यदिनी लोकमान्य विद्यालयात कोरोना योद्ध्यांचा सत्कार. #Hospitality



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील लोकमान्य विद्यालयातर्फे स्वातंत्र्य दिनी शहरातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य विद्यालयाचे संचालन करणा-या लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार होते.तर प्रमुख अतिथी म्हणून लोकसेवा मंडळाचे सचिव मनोहरराव पारधे, सहसचिव नामदेवराव कोल्हे, लोकसेवा मंडळाचे सदस्य मधुकरराव नारळे, उमाकांत गुंडावार, गोपालराव ठेंगणे, अविनाश पाम्पट्टीवार, आशिष गुंडावार, अमित गुंडावार, संजय पारधे, मुख्याध्यापक बंडू दरेकर आणि सत्कारमूर्ती कोरोना योद्धे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत माता आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. याप्रसंगी जि.प.च्या मुख्य कार्यपालन अधिकारी मिताली सेठी यांच्या संकल्पनेतील कुंडी वृक्षारोपन विद्यालयाच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांकरीता आभासी देशभक्तीपर गीत गायन व स्वातंत्र्य दिनावर भाषण या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. त्यात अनेक विद्यार्थी सहभागी झाले.#Adharnewsnetwork
यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, डाॅ.विवेक शिंदे, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.अडगुडवार, वाहतूक शिपाई तनू टेकाम, रुग्णवाहिका चालक पंकज कातोरे, स्वर्गरथ चालक अजय खांदारे, नगरसेवक विनोद वानखेडे, कॅटरर्स व्यवसायी हनुमान घोटेकर आणि सफाई कामगार मारोती नान्हे यांचा कोरोना योद्धे म्हणून मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डाॅ.विवेक शिंदे, डाॅ.अडगुडवार आणि विनोद वानखेडे यांनी आपल्या भाषणातून सत्काराला उत्तर दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बंडू दरेकर यांनी केले. संचालन शिक्षिका प्रिया भास्करवार यांनी केले.तर आभार शिक्षक रुपचंद धारणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.#Hospitality

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने