जाहिरात... Advertisement... विज्ञापन

स्वागताचा फोटो टाकून चंद्रपुरात जाहीर केली स्वयंघोषित नियुक्ती. #Self-proclaimed #appointment

हजारे हे शिवसेना प्रणित कोणत्याही पदावर नाही:- प्रशांत कदम शिवसेना संपर्क प्रमुख चंद्रपूर


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- शिवसैनिक बंडू हजारे यांनी सोशल मीडियावर कामगार सेनेच्या चंद्रपूर जिल्हा संघटक पदाची नवी जबाबदारी भेटल्याचे घोषित केले मात्र त्यांची नियुक्ती वैध नाही असे शिवसेना चंद्रपूर संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांनी जाहीर केले आहे. #Adharnewsnetwork
कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन अहिर यांची बंडू हजारे यांनी भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, मात्र त्या फोटोचा वापर करून मला नवी जबाबदारी मिळाली असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतः जाहीर केले. त्यांच्या या पोस्टने नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला, मात्र आज बंडू हजारे यांचा पचका झाला आहे. 

       शिवसेना चंद्रपूर संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांनी प्रसिद्धी पत्रकातून माहिती दिली की अशी कोणतीही नियुक्ती करण्यात आलेली नाही, मात्र हजारे यांनी सोशल मीडिया द्वारे मला पद मिळालं असे सांगत फिरणे हे चुकीचे आहे, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून चंद्रपूर जिल्हा कामगार सेना संघटक पदासाठी लवकरच मुख्यमंत्री ठाकरे, कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, सरचिटणीस सचिन अहिर व चिटणीस दीपक पाणिकर यांच्या आदेशाने नवी नियुक्ती करणार असल्याचे सुद्धा कळविले आहे.
माजी नगरसेवक हजारे यांना या अतिउत्साही पणाचा चांगलाच फटका बसला आहे, चिटणीस पाणिकर यांच्या कानी जेव्हा ही बाब कळली त्यावेळी त्यांनी कठोर भूमिका घेतलेली आहे, हजारे यांनी मी मुंबईला येतो आपल्याला भेटतो असे म्हटले मात्र पाणिकर यांनी त्यांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला आहे. बंडू हजारे यांच्याजवळ शिवसेना प्रणित कोणत्याही संघटनेचे पद नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती कदम यांनी दिली आहे.Self-proclaimed #appointment

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत