Click Here...👇👇👇

अतुल खापने ग्रामगीताचार्य पदवीने सन्मानीत. #Bhadrawati

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथील श्री. गुरुदेव सेवा मंडळाचे युवा कार्यकर्ते तथा राष्ट्रधर्म युवा मंचचे जिल्हा उपाध्यक्ष अतुल खापने यांना गुरुकुंज आश्रम, मोझरी येथे पार पडलेल्या ग्रामगीताचार्य पदवीनदान समारंभात ग्रामगीताचार्य पदवीने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

🟥 ‌ अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम, मोझरी अंतर्गत ग्रामगीता जीवन विकास परिक्षा विभागाचे वतीने घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत संपुर्ण महाराष्ट्रातुन मोठ्या प्रमाणात अनेक विद्यार्थी सहभागी होत असतात.
 🟥
      परिक्षेच्या या मालिकेत अत्यंत कठीण व खडतर प्रक्रियेतुन जात विद्यार्थी ' ग्रामगीताचार्य ' या अंतिम परिक्षेत ही पदवी प्राप्त करीत वं. राष्ट्रसंताच्या साहित्याच्या प्रचार व प्रसाराचा संकल्प घेत असतात. सत्र २०२०- २१ मध्ये झालेल्या ' ग्रामगीताचार्य ' परीक्षेमध्ये अतुलजी खापने हे उत्तीर्ण झाले.  गुरुकुंज आश्रम येथे संपन्न झालेल्या 'ग्रामगीताचार्य पदवीदान समारंभा' मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह, गुणपत्रिका व ग्रामगीताचार्य पदवी देऊन खापने यांना सन्मानित करण्यात आले.

       🟥 त्यांना ग्रामगीताचार्य पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे येथील श्री. गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे. 🟥