जाहिरात... Advertisement... विज्ञापन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त सेवा दिवसाचा तिसरा दिवस. #Pombhurna


केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये घनोटी तुकुम येथील अंगणवाडी व जि.प.शाळेतील मुलांना नोटबुक,पेन, पेन्सिल चे वाटप करून सेवा दिवस साजरा.

पोंभुर्णा:- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त सर्वत्र सेवा दिवस साजरा केला जात आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशान्वये केमारा-देवाडा जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांच्या तर्फे घनोटी तुकुम येथील अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना नोटबुक, पेन, पेन्सिल देऊन सेवा दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य यशवंत ढोंगे, भाजपाचे प्रमुख शामसुंदर नैताम, रामकृष्ण गव्हारे, लक्ष्मण गव्हारे, जयंत पिंपळशेंडे, चंद्रशेखर झगडकर, अनुप श्रीकोंडावार, राहुल वासेकर यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत