जाहिरात... Advertisement... विज्ञापन

अमलनाला धरणात दोघांचा बुडून मृत्यू. #Death(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना.
कोरपना:- अमलनाला धरणाजवळील वेस्ट वेअर आज दुपारी 2 युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतकांची नावे नदीम फिरोज अली (21) बल्लारपूर, तोफिक निसार शेख (22) विहिरगाव अशी आहे. #Death
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बुडालेल्या युवकांना बाहेर काढले व पंचनामा करून शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे 2 युवकांना आपला जीव गमवावा लागला आहेत.
  सदर ठिकाणी बऱ्याच वेळा दुर्घटना घडली आहे. मागील महिन्यात चंद्रपूर येथील एका युवकाचा बुडून मृत्यू झाला होता. आज पुन्हा एकदा त्याच ठिकाणी 2 युवकांना जलसमाधी मिळाली आहे. पोलीस प्रशासन ने सदर क्षेत्र मध्ये पर्यटक ला जाण्यासाठी बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत