Top News

विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाच्या मागण्यांना घेऊन समाजबांधवाची तहसीलवर धडक. #Pombhurna


(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाच्या विविध मागण्या घेऊन समाज बांधवांनी भटक्या विमुक्त जाती जमाती समाज क्रांती आघाडी चे राष्ट्रीय युवा नेते संजय कदम,पोंभुर्णा तालुक्यातील समाजाचे अध्यक्ष रणपती वडस्कर , युवा नेते गणेश वासलवार यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय व पोलिस ठाण्यावर धडक दिली व आपल्या विविध मागण्या चे निवेदन तहसीलदार पोंभुर्णा यांना दिले.
पोंभुर्णा तालुक्यात भटक्या समाजातील लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे परंतु स्वातंत्र्याचा ७५ वर्षांनंतर हि भटक्या समाज विकासापासून कोसो दूर आहे.भटक्या समाज हा सामाजिक, आर्थिक, राजकीय सांस्कृतिक दृष्ट्या मागास आहे.या समाजाला भारतात स्मशानभूमीची जागा सुद्धा उपलब्ध नाही. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने कोणतीही उपाययोजना केली नाही. भारत देश शायनिंग होत असताना भटक्या समाज मात्र विकासापासून वंचित राहिलेला आहे या समाजाचे प्रश्न सोडवुन या समाजाला न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.
भटक्या विमुक्त जाती चे गाव नवीन गंगापूर ग्रामपंचायत च्या रेकार्ड वर चढविण्यात यावे, नविन गंगापूर येथील वि.जा.भ.ज.समाजाला शेतजमीनीचे पट्टे देण्यात यावे,पोंभुर्णा तालुक्यातील भटक्या समाजातील गरीब लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावे, भटक्या समाजातील युवकांना नौकरी देण्यात यावी, भटक्या समाजातील लोकांना कर्ज देण्यात यावे,वाचणालयाची सोय करण्यात यावी, विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला राजकीय आरक्षण द्यावे, व समाजाला ॲट्रासिटि कायद्याचे संरक्षण देण्यात यावे, अशी विविध प्रकारची मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
 या आंदोलनात रणपती वडस्कर,राजू कस्तूरे, सुहास वाघाडे, अरविंद गद्देकार, जालिंदर सावंत, अनिल सोपनकार,सुरज राऊत, राकेश गद्देकार यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने