कोब्रा नाग सापाच्या दंशाने युवा शेतमजुराचा मृत्यू. #Death #snake #snakenews

Bhairav Diwase
0

(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- किसान नगर येथील शेतमजूर सुनील सुरेश कुडावले वय 27 वर्ष याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. सदर शेतमजूर हा आपल्या कौटुंबिक उदरनिर्वाह करीता रोजीने शेतमजूर म्हणून काम करायचा. सदर शेतीचा हंगाम असल्याने शेतमजूर हा शेतामध्ये पाणी करण्याकरिता गेला असता तर त्याच्या हाताला कोब्रा नाग या सापाने तब्बल तीनदा चावा घेतला. #Death #snake #snakenews
सदर ही घटना बाजूच्या शेतकऱ्यांना लक्षात येताच त्याला जिल्हा सामान्य रुग्णालया गडचिरोली येथे भरती करण्यात आले. सदर शेत मजुराच उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृत्यू पश्चात आई, पत्नी, दीड वर्षाचा मोठा मुलगा व नुकत्याच जन्माला आलेला दीड महिन्याचा लहान मुलगा आहे. सदर शेतमजूरला आर्थिक भरपाई देण्यात यावी अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)