Click Here...👇👇👇

हैदराबाद येथील अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा जिवतीत निषेध. Jivati

Bhairav Diwase

विदर्भ राज्यआंदोलन समितीकडून जिवती ठाणेदारांना दिले निवेदन.
जिवती:- हैदराबाद येथे राहत असलेल्या कु.चरीत्रा या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने दि 11/09/2021 रोजी संगारेड्डी येथे अत्याचार करून खून करण्यात आलेला असून सदर घटना ही अमानवीय आहे. या घटनेतील आरोपीला त्वरित अटक करून अत्याचार विरोधी तथा हत्या संदर्भातील कलमानुसार गुन्हा नोंदवून त्याला फाशीची शिक्षा देऊन सदर कुटुंबियांना न्याय मिळवून द्याल अशी विनंती विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे गृहमंत्री अमित शाह यांना पोलीस स्टेशन जिवती ठाणेदारमार्फत पाठवण्यात आले.
यावेळी उपस्थित विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुदाम राठोड, सोशल मीडिया अध्यक्ष चंद्रपूर विशाल राठोड, अरविंद चव्हाण युवा आघाडी जिवती तालुका अध्यक्ष, सुनील राठोड वि रा आ स तालुका अध्यक्ष जिवती, विनोद पवार जिवती शहर अध्यक्ष, सुरेश राठोड, वासुदेव जाधव, व्यंकटी चव्हाण, प्रविण चव्हाण, वामन पवार, गोवर्धन पवार, मणमंथ वारे आदींची उपस्थिती होती.