वरोरा येथे जुगार अड्ड्यावर धाड. gambling

11 आरोपिसाहित 10 लाखांचा मुद्देमाल जप्त.

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
वरोरा:- 3 दिवसांपूर्वी वरोरा येथे जुगार अड्ड्यावर झालेल्या हाणामारीत शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांना अटक करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असताना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने जुगार बहाद्दरांवर वरोरा येथील जेबी हॉटेलवर धाड मारली आहे.

 🃏वरोऱ्यात राजकीय जुगार अड्ड्यावर "राडा".

🚩शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते अटकेत.
http://www.adharnewsnetwork.com/2021/09/warora-politics-rada-gambling.html


💥मुलगी भाव देत नाही; खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र.
12 तारखेला स्थानिक गुन्हे शाखेला जेबी हॉटेल वरोरा येथे जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचत धाड मारली असता त्याठिकाणी हॉटेल मालकासाहित 11 जुगार बहाद्दरांना 52 पत्त्यांचा खेळ खेळत असतांना अटक करण्यात आली.
यावेळी रोख रक्कम 32 हजार 840, 10 मोबाईल संच 81 हजार 500 रुपये, 8 दुचाकी वाहने किंमत 9 लाख 10 हजार असा एकूण 10 लाख 28 हजार 390 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईने स्थानिक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सपोनि जितेंद्र बोबडे, पोउपनी संदीप कापडे, धनराज करकाड़े, अमोल धंदरे, प्रशांत नागोसे व रवींद्र पंधरे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत