Top News

ग्राम संवाद सरपंच (संघ ) असोशिएशनच्या राज्य सरचिटणीसपदी निलेश पुलगमकर. #Appointment

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- तालुक्यातील हिवरा गावचे सरपंच निलेश पुलगमकर यांची ग्राम संवाद सरपंच(संघ) असोशिएशनच्या राज्य सरचिटणीसपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.या संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष अजिनाथ धामणे यांनी तसे पत्र काढले.पुलगमकर यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. #Appointment
गोंडपिपरी तालुक्यातील हिवरा गावचे सरपंच असलेले निलेश पुलगमकर यांनी यापूर्वी देखिल अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या पेलल्या आहेत.ऐवढेच नाही तर वेळोवेळी येणाऱ्या जबाबदाऱ्यांना तेवढ्याच ताततीने न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.पुलगमकर सद्यस्थितीत गोंडपिपरी तालुका सरपंच संघटनेचे सचिव आहेत.असे असतांना तीन महिण्यापूर्वी याच संघटनेच्या विदर्भ सरचिटणीसपदी त्यांची निवड झाली होती.या दरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत पुलगमकर यांनी राज्यातील बऱ्याच भागातील आदर्श गावांचा दौरा केला.या दौऱ्यादरम्यान गावविकासासाठी आवश्यक बाबीची माहिती जाणून घेतली.गावचा विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
अश्यावेळी पदाधिकारी,अधिकारी यांच्या समन्वयातून आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने ग्रामविकास शक्य असल्याची बाब यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लक्षात आली.यामूळे ग्रामीण भागात सरपंच,उपसरपंच आणि सदस्य म्हणून काम करतांना पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून चालणार आहे.ऐकूनच पुलगमकर यांचा ग्रामीण भागांतील अनुभव पाहता त्यांची विदर्भ सरचिटणीस पदावरुन राज्य सरचिटणीसपदी नुकतीच निवड करण्यात आली.राज्याच्या टोकावर असलेल्या गोंडपिपरी तालुक्यासह परिसरातील ग्रामीण भागात पुलगमकर मार्गदर्शनाद्वारे तर कधी प्रसंगी प्रत्यक्ष भेटी घेवून पदाधिकाऱ्यांच्या समस्या सोडवत असतात.
पुलगमकर गेल्या अनेक वर्षापासून समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहेत.मुंबई ग्रामपंचायत अधिनीयमाचे देखिल ते अभ्यासक आहेत.आपल्या अभ्यासू आणि खिलाडू वृत्तीने आजतागायत त्यांनी तालुक्यासह परिसरातील अनेक समस्या सोडविल्या आहेत.समाजसेवेचा हा त्यांचा वसा निरंतर सुरु आहे.अश्यातच नुकतीच त्यांची ग्राम संवाद सरपंच(संघ) असोशिएशनच्या राज्य सरचिटणीसपदी निवड झाली आहे.
आपल्याला दिलेल्या जबाबदारी स्विकारुन ग्रामपंचायतीचे कामकाज करतांना पदाधिणाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवणूकीसाठी मी कोठलीच कसर सोडणार नाही,असे मत निवडीबद्दल निलेश पुलगमकर यांनी व्यक्त केले.पुलगमकर यांच्या निवडीवर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मंडळींनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने