जाहिरात... Advertisement... विज्ञापन

वडीलांच्या समोरच मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू. #Death

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- वडील सोबत शेतपिकांना फवारणी साठी पाणी आणण्यासाठी वडील व मुलगा बैलबंडीने लगतच्या खोद तलावात गेले. परंतु तोल जाऊन दोघेही पाण्यात पडले यावेळी वडील पाण्यातून पोहत बाहेर आले. परंतु मुलाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक १२ सप्टेंबर रोजी उपरवाई येथे घडली. #Death 

💥मुलगी भाव देत नाही; खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र.

या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली हळहळ व्यक्त होत आहे. उपरवाही येथील शेतकरी किसन मटाले हे आपल्या १७ वर्षीय मुलगा पवन याला घेऊन बैलबंडीने जवळच्या खोद तलावात जाऊन ड्रम मध्ये पाणी भरीत असतानाच बंडी सुलार झाली यामुळे या दोघाचाही तोल गेला आणि खोल पाण्यात पडलेत वडील पोहत कसेबसे बाहेर पडले.
परंतु मुलगा मात्र बाहेर आला नाही, वडिलांनी बराच शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पाण्याबाहेर आला नाही अखेर ही बातमी गावातील लोकांना सांगितली लोकही लगेच धाव घेतली पोलिसांनाही माहिती देण्यात आली अखेर स्थानिक काही लोकांचे मदतीने पाण्यातून त्या मुलाचे शव बाहेर काढण्यात आले.
राजुरा पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास करीत आहे. या घटनेत वडीलादेखत मुलाचा करून अंत झाल्याने ग्रामस्थ, नातलगांत शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत