जाहिरात... Advertisement... विज्ञापन

जि.प.सदस्य श्री. रमाकांत लोधे आयोजित मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरातील रुग्णांची शस्त्रक्रियेकरीता रवानगी. #Program

कोरोना काळातही राखली मोतीबिंदू शिबिराच्या आयोजनाची अविरत परंपरा.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- तालुक्यातील मोतीबिंदू रुग्णांना नवदृष्टी देण्याच्या उद्देशाने मोतीबिंदू उच्चाटनाची चळवळ हाती घेऊन सातत्याने तालुक्यात शिबिरे आयोजन करणारे व्यक्तिमत्व श्री. रमाकांत लोधे (जि. प. सदस्य) यांनी कोरोना काळातही गावस्तरीय शिबिराची परंपरा कायम ठेवली आहे.
खरंतर मोतीबिंदू हा वृद्ध व्यक्तींची नुसती दृष्टीच हिरावून नाही तर आयुष्याचा काळोख करणारा गंभीर असा रोग. तो बहुतांश वृद्ध व्यक्तीमध्ये आढळतो. अशा व्यक्तींना अंधुक ,फुसट तर कधी पूर्णपणे दृष्टी जाण्याची भीती या रोगाच्या लक्षणात दिसून येते.म्हणून अशा मोतीबिंदू रुग्णांची वाढती संख्या पाहून तालुक्यात मागील १५ वर्षांपासून शिबीरे राबवुन याहीवर्षी तालुक्यात शिबिराच्या आयोजनातून परंपरा कायम राखली आहे.
नुकताच सिंदेवाहि तालुक्यातील मौजा मोहाळी (नलेश्वर) येथे श्री. रमाकांत लोधे जि.प.सदस्य यांनी गावस्तरीय विनामूल्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.
दि.9 सप्टेंबर 2021 रोजी गावातील 125
मोतीबिंदू रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि यात 37 रुग्णांची शस्त्रक्रियेकरीता निवड करून त्यांची सेवाग्राम नेत्र रुग्णालय येथे  रवानगी करण्यात आली.#Adharnewsnetwork


     शासन स्तरावरील कोरोना निर्देशामुळे व्यापक स्वरूपातील शिबीरे आयोजन करणे शक्य नसल्याने गावस्तरीय शिबिराची संकल्पना राबवून मोतीबिंदू उच्चाटनाचा मनात योजलेला मानस श्री.रमाकांत लोधे यांनी सत्यात उतरविला आहे.#Program

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत