Top News

पोंभूर्ण्याच्या सहाय्यक शिक्षीका स्मिता अवचट यांना आदर्श शिक्षक पुरस्कार. #Award


(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभूर्णा:- जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी या वर्षी जिल्हाभरातून ३६ प्रस्ताव आले हाेते. यामध्ये माध्यमिक व कला विभागातून प्रत्येकी एक प्रस्ताव होता. या दोन विभागांत कोणतीही स्पर्धा नव्हती. मात्र प्राथमिक विभागातून १५ पुरस्कारांसाठी अटीतटीची स्पर्धा झाली. आयुक्तांकडून मंजुरी मिळताच शिक्षक पुरस्कारांसाठी निवड झालेल्या १६ शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये दिव्यांग कला, विशेष आणि माध्यमिक विभागातून प्रत्येकी एका शिक्षकाचा समावेश होता.
पोंभूर्णा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोंभूर्णा येथे ४ वर्षांपासून कार्यरत असलेले सहाय्यक शिक्षिका स्मिता अवचट यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला.‌ शिक्षक दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन स्मिता अवचट यांना सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन स्व. कर्मवीर दादासाहेब मा. सा. कन्नमवार सभागृह, जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, , वित्त व बांधकाम सभापती राजू गायकवाड, समाज कल्याण समिती सभापती नागराज गेडाम, कृषी पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती सुनील उरकुडे, महिला व बालकल्याण समिती सभापती रोशनी अन्वर खान, सर्व जिल्हा परिषद सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, शिक्षणाधिकारी (माध्य)उल्हास नरड, शिक्षणाधिकारी (प्राथ)दिपेन्द्र लोखंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने