Top News

आ. सुधीर मुनगंटीवार तर्फे मोहन कलेगुरवार यांचा सत्कार. #Hospitality

पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापिठ, गडचिरोली कडून घेण्यात आलेल्या विधी पदवी परिक्षेचा निकाल नुकताच घोषीत झाला. यामध्ये मुळचा राजुरा येथील रहिवासी मोहन लिंगाजी कलेगुरवार हा या परिक्षेत प्राविण्यासह उत्तीर्ण झाला आहे. राजुरा तालुक्यातील मादगी समाजात विधीचे शिक्षण घेणारा हा पहिलाच युवक असून राजुरा मादगी समाजातील मोहन कलेगुरवार हा पहिला वकील ठरला आहे. त्याच्या या यशाबद्दल समाजामधून कौतूक व्यक्त केल्या जात आहे.
मोहन कलेगुरवार यांचे वडील महसुल विभागात चतूर्थ श्रेणी कर्मचारी पदावर कार्यरत आहे. मोहन यांचे प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण राजुरा येथे अत्यंत हालाखीच्या परिस्थीतीत झाले. त्यांनी पत्रकारीतेत पदविकेचे शिक्षण पूर्ण केले असून पत्रकारीता पदविकेते विद्यापिठातून तिसरा येण्याचा मान त्यांनी पटकावला होता. त्यानंतर त्यांनी शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय, चंद्रपूर येथून विधी पदवीचे शिक्षण घेतले. यात ते प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहे.
त्यानिमित्य महाराष्ट्राचे माजी वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री  लोकलेखा समिती चे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते त्यांचा कार्यालयात मोहन कलेगुरवार यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिली. त्यावेळी भाजपा व भाजयुमो पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने