❤️प्रियकराच्या शोधात प्रेयसी पोंभूर्ण्यात दाखल.
⭕प्रेयसीला पाहून प्रियकर झाला रफू-चक्कर.
@#"प्यार करने वाले कभी डरते नही,जो डरते है वो प्यार करते नही" हे गीत ८० च्या दशकात प्रचंड गाजलं. मुलीच्या वडिलाचा विरोध असतांनाही प्रियकर जीवाचं रान करून आपल्या प्रेयसीला आपलं करतो.खरं तर या चित्रपटात प्रेयसीच पुढाकार घेते. या चित्रपटातील जॅकी श्रॉफ व मिनाक्षी शेषांद्री हे कलावंत अनेक तरूण मुला- मुलींचे ऑयडल झाले. एक दुजे के लिए म्हणत काहींनी घरचा विरोध पत्करून मेरे जीवनसाथी म्हणत 'लव्ह मॅरेज' करून घर बसविला. काहींचं चांगलं फावलं तर बऱ्याच जणांचा मात्र 'हम लुट गये, तेरी मोहब्बत मे' अशी म्हणण्याची गत झाली. हे काही जरी असलं तरी प्रेम मात्र प्रत्येक दशकात तितकंच पाॅवरफुलपणे व्यक्त होतांना दिसतो आहे. एव्हाना प्रेमाचा नव्या जमान्यात नवा फार्मेंट रूढ होतांना अलीकडे दिसतो आहे.
हिर- रांझा,लैला- मजनू, शिरी-फराहन,मुमताजमहल-शहाजहानच्या सच्च्या प्रेमकाहाणीतील खरं प्रेम पाहिलं तर अडिच अक्षरी प्रेमातील ताकद समजून येते. आणि आता तर या नव्या दमातील(इंटरनेट युगातील) अलीकडचं आर्ची-परश्या (चित्रपटातली काल्पनीक जोडी) चं प्रेम पाहिलं तर कळतं की - प्रेम आपली जागा बदलत चालला आहे. तसंच प्रेमाकडे पाहणारा समाजही आपली जागा बदलवत आहे. लाखोच्या संख्येने प्रेम प्रकरण समोर येत आहेत. त्यात असलेली प्रत्येकाची प्रेम कहाणी ही वेगळ्या धाटणीची आहे.
दुल्हन हम ले जाएंगे च्या धर्तीवर आता तर दुल्हा हम ले जाएंगे असं म्हणणारी फळी तयार झाली की काय अशी काहीशी स्थिती सध्या काही प्रेम प्रकरणातून दिसून येत आहे. बदल हा नक्कीच चांगला असावा. परिवर्तन संसारका नियम है. असं जे काही आपण ऐकत आलोय तर ते योग्य असेलही. पण ते बरोबरच योग्य दिशेने वाटचाल करतेय का हे सुद्धा तितकच महत्त्वाचं आहे.तेही खरं तर तपासलं पाहिजे.असो...
पण असाच एक- दुल्हा हम ले जाऐंगे म्हणणारा किस्सा पोंभूर्ण्यात पाहायला मिळाला.
स्मार्ट सिटी असलेल्या पोंभूर्णा शहराच्या बस स्टॉप चौकामध्ये सकाळच्या सात वाजता पासुनच दोन मुली हरवलेल्या प्रियकराच्या शोधात गल्ली न गल्ली पिंजून काढत होती. शहरातील सर्वच चौकात जावून प्रियकराची चौकशी करीत होती. पण जिथे जावं तिथे फक्त थापाडे. काही पुढाऱ्यांनी हिताचा सल्ला दिला. तर काही सामाजीक कार्यकर्त्यांनी सरळ गावी जाण्याचा सल्ला देत टॅक्सी जवळ आणूनही दिला. मात्र सुध- बुध विसरलेली हि मधूबाला कुणाचं काय एैकेल.कुणीतरी प्रियकर तळीराम असल्याची खबर दिली व तो मदीरा प्राशन करण्यासाठी पोंभूर्ण्याच्या बार मध्ये येत असतो असं सांगितला. बस काय इतकं ऐैकूणच मुलींनी आपला मोर्चा मद्यालयाकडे वळविला. ठिय्या आंदोलनाचा फार्स काही तास झाल्यानंतर तो हातात काही आला नाही. पुन्हा मोर्चा वळला बस स्टॅण्ड चौकात. नशीबाने प्रियकर सापडला. प्रियकर भेटताच प्रियसीने त्याच्या फटफटीवर( स्कुटीवर ) बसून मला तुझ्यासोबत घेऊन चल म्हणणारा तगादा सुरू केला. त्या दोन्ही मुलींना तो आपल्या स्कुटीवर बसवून इंधन भरण्याच्या बाहाण्याने पेट्रोल पंपकडे आणला. आणल्यानंतर गाडी बंद झाल्याचे कारण सांगत तो रफू-चक्कर झाला. मग सुरू झाला त्या मुलींच हाय व्होल्टेज ड्रामा. प्रियकरासाठी प्रेयसीची धडपड सुरू झाली. याला विचार, त्याला विचार, याला फोटो दाखव त्याला फोटो दाखव. नको ते केविलवाणे प्रयत्न सुरू होते. हि केविलवाणी धडपड व प्रियकर देता का, प्रियकर हि भेसूर आरोडी शहरवासीयांनी अनुभवली. बऱ्याच वेळच्या या हायव्होल्टेज ड्राम्या नंतर जबाबदार माध्यमांनी मध्यस्थी करून त्या दोन्हीही मुलींना त्यांच्या परीवारातील सदस्याला बोलवून त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात केले.
नेमकं प्रियकर शोधण्यासाठीचा हा हाय व्होल्टेज ड्रामा का व कशासाठी? प्रेयसी गडचिरोलीची, प्रियकर गडचिरोलीचा, मग बेदर्दी बालम पोंभूर्ण्यात कसा? तळीराम प्रियकरासाठी या मधूबालाची कशासाठी चालू होती धडपड?
निट समजायला कठीण होतंय....पण बघू फोडणी कशी असेल...या हाय व्होल्टेज ड्रामाच्या भाजीची.....
वनराईने नटलेल्या व प्रदुषण विरहीत असलेल्या गडचिरोली शहरात एक प्रेम काहाणी फुलली. हातात हात घालून दोघांनी अनेक आणा- भाका घेतल्या नव्हे त्यांनी सात जन्म एकत्र राहण्याची बुकींगच करून टाकली. जवळच असलेल्या वैनगंगेच्या तीरावर बसून मावडत्या सुर्याला पाहून अनेक डुऐट गाणी दोघांनी मिळून गायलीत. अनेक रोझ डे, चाॅकलेट डे,व्हेलेनटाईन डे, आणखी काही-बाही डे साजरे झाले. समुच्छ फुलाचा गुलदस्ता हर डे ला तयार राहायचा. काही डे ला फुलाचा गुलदस्ता देण्यासाठी वेळ व्हायचा किंवा शक्य नसायचं.पण त्या गुलदस्त्यातील सुकलेली फुले मात्र नको तसे जपून ठेवली जायची. पहेला नशा पहेला खुमार म्हणणारी आंधळी व डोबकाडच माझं जग म्हणणारी प्रेम नावाची भक्ती. सर्व आलबेल है असं म्हणत सुकलेले पानं काळजाच्या कोनाड्यात सांभाळून ठेवण्यात मग्न राहायची. गुलदस्ते जरी सुकत असले तरी दोघांचा प्रेम मात्र टवटवीत गुलाबा सारखा फुलतच राहीला (दृष्ट लागू नये एवढा. दृष्ट लागली तरी काही फरक पडणार नव्हतं) - कारण जीना सिर्फ मेरे लिये- हे गाणे दोघांनी खुपदा गायले होते...
...व्हायचं ते भल्लतं झालं अन् मुलीकडे स्थळ आलं. कांदे पोहे उरकले अन् सगाईचा बार उडविण्यात आला. मात्र प्रेमात आकंठ बुडालेले हे लैला मजनू कसे वेगळे राहतील. मजनूनी असा डाव रचला की तिची सगाई तुटली. बस दोघेही खुष. पण हा आनंद तो काहीच दिवस टिकला. सगाई तुटली म्हणून मजनू कडे लग्नाचा प्रस्ताव प्रेयसीने मांडला. आणि इथेच माशी शिंकली आणि प्रियकर बेदर्दी बालमा झाला.
प्रियकर कोंबड्या सारखं उडू -उडू करू लागला ,तिच्या पासून लांब राहू लागला, कारणे सांगू लागला, नको ते थापा देऊ लागला, कित्येक दिवस तो शहरात दिसतच नव्हता.
प्रेयसीचा पिच्छा सोडविण्यासाठी गावोगावी हुंदळू लागला.. नातेवाईकाडे बिराड मांडू लागला.
तो आला तर आला पोंभूर्ण्याच्या आजूबाजूच्या खेड्यात आला . लांडग्याची गोष्ट खेड्यात तरी लपत नाही. तशी खेड्यात कोणती गोष्ट लपली तर गेलंच समझा.... खेड्या गावात 10G चं नेटवर्क असतं. क्षणात खबर अमेरीकेत पोहचू शकते तर मग वैनगंगेच्या पलीकडच्या गोष्टीची काय बिशाद. गावातली कुजबुज नेटवर्क पॉलिसी हळूहळू त्या काठावर असलेल्या प्रेयसीच्या कानावर पडली. आणि ती शंभर किमी चा प्रवास करित पोंभूर्ण्यात दाखल झाली. सोबतीला मैत्रीण होती. मग सुरू झाला हाय व्होल्टेज ड्रामा. ड्रामा काय म्हणता. अख्ं चित्रपट सुरू होता.
पोंभूर्ण्यातील चौक- चौक फिरणं असो, भेटेल त्याला प्रियकराचा फोटो दाखवत तो इथे आहे का असं वाचारणं असो. मग काय तर बघ्यातल्या एकानं एक अणूबॉम्बचं टाकलं म्हणे हा फोटोतला गृहस्थ दारु पिण्यासाठी रोज नऊ वाजता बारमध्ये येतो. असं कळल्यावर आर्ची आपल्या मैत्रीणीला (बिचाऱ्या) मैत्रीणीला सोबतीला घेऊन भट्टी + बार च्या समोर दोन तास थान मांडून बसून वाट पाहणं झालं. काय करावं असं झालं होतं तीला. आणि मदिरा किंग मदिरालयात दिसला मग काय तर आर्चीचा पारा सणकला. पुढचं काय तर गाव खेड्याचा चावडी नेटफिक्सवर बिना पैश्याचा ड्रामा सुरू झाला. कसा बसा हा कैदमे है बुलबुल वाला प्रियकर "मी तुझाचं आहे म्हणत हातपाय जोडत होता.... बिचाऱ्या आर्चीला पुन्हा परश्याची कीव आली....
सोबतच मिळून जाण्याची तडजोड पेट्रोल भराण्याच्यावर येऊन थांबला. पेट्रोल टाकण्याच्या प्रियकराचा बाहाणा काम करून गेला. मग काय प्रियकर, प्रेयसी अन् बिचारी मैत्रीण या तिघांचं पेट्रोल पंप कडे जाणं झालं. भिडभाड पासून दुर झाल्यावर गाडी खराब झाल्याचा टिपीकल बाहाणा करीत प्रेयसीला दुपारच्या भर उन्हात वाटेवरच सोडून चाट मारून पळ काढलेला प्रियकर असो. आणि मग पदयात्रा करीत बस स्टॅण्ड चौकात येऊन ओक्साबोक्शी रडगाणं करणारी प्रेयसी असो.
बेदर्दीने प्यार को सहारा ना दिया .... म्हणत प्रियकराच्या नावाने बोटं मोडणाऱ्या प्रेयसीला पाहिलं की वाटते- "प्रेमा तुझा रंग कसा-दिसतो तसा नसतो तसा " काय गत म्हणावी प्रेमाची आणि त्या भोळ्या भाबड्या प्रेयसीची.....
स्वत:ला पुरूष म्हणवणारा हा पळकुटा प्रेमविर पाहिलो की वाटते... तो कसा असेल आणि त्याचा प्रेम कसा असेल...? पण यात दोष कुणाचा म्हणावं तीचा की त्याचा...?
तीच्या त्या भांभीरीतून ती जागी झाली तेव्हा सहज विचारलो...., कशासाठी हे सारं काही केलीस? काय मिळालं तुला? खरंच तु याला प्रेम म्हणशील का? आई वडीलांनी हेच बघायसाठी तुला आपल्या डोळ्यात साठवलं असेल का? खरंच प्रियकर म्हणवून घेणाऱ्याचं प्रेम हे इतकं प्रभावी असतं का, की तुझ्या अस्तित्वासाठी आई वडीलांनी स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन तुला स्वतापेक्षाही जास्त कवटाळलं होतं ते प्रेम कमजोर झालं का? खरंच आई वडिलाची उब ही पळकुट्या प्रियकरापेक्षा कमी होती का?
#----ती स्तब्ध राहिली अन् म्हणाली... माझी अक्कल माती खायला गेली होती.... पण मी समजलो आहे. प्रेमात ताकत- विकत काही नसते.... जसं जमेल तसं पर्याय शोधायचं असते.
मला आता एवढंच कळलं...
#@माती खाली आणि मी इथे आली#
-सोंगाड्याचा झोरा
७/१२ वर
(टिप:- सदर घटना/ कथा हि काल्पनीक आहे. याचा वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही. जर कुणाचा संबंध आलाच तर तो फक्त योगायोग समजावा)
#आधार न्यूज नेटवर्क दर रविवारी असेच भन्नाट विषय आपल्या समोर घेऊन येईल.. @सोंगाड्याचा झोरा- ७/१२ वर @या सदरा खाली.... फक्त तुमच्यासाठी