भंडारा:- महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांनी थेट उपविभागीय अधिकारी (SDM) यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळूची चोरी Sand theft करणाऱ्या ट्रॅकचा पाठलाग करत असताना माफियांनी त्यांच्या गाडीला बोलेरोने कट मारून पलटी केली. या हल्ल्यात एसडीएम माधुरी विठ्ठल तिखे madhuri Tikhe आणि त्यांचे पती दोघेही जखमी झाले आहेत.
माधुरी तिखे या भंडारा Bhandara येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ९ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास त्यांना चांदोरी-पचखेडी मार्गावर काही ट्रक अवैध वाळू वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर, पहाटे ५ वाजता त्या आपल्या पतीसोबत सरकारी अर्टिगा कार घेऊन अवैध वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी निघाल्या. वाटेत त्यांना एक संशयास्पद ट्रक (MH 36 AA 106) वाळूने भरलेला दिसला. माधुरी तिखे यांनी लगेच 'महा खनिज' ॲप वापरून तपासणी केली असता, त्या ट्रकमधील वाळूची रॉयल्टी भरलेली नव्हती, म्हणजेच ती चोरीची वाळू होती हे सिद्ध झाले. त्यांनी तातडीने त्या ट्रकचा पाठलाग सुरू केला.
यावेळी, अवैध वाळूने भरलेल्या ट्रकला संरक्षण देत असलेली एक बोलेरो (MH 36 AL 2853) गाडी त्यांच्या पुढे अचानक आली आणि तिने सरकारी गाडीला कट मारण्यास सुरुवात केली. बोलेरोच्या चालकाने वारंवार ब्रेक लावून आणि रस्त्यात गाडी उभी करून एसडीएम यांच्या वाहनाला खाली ढकलण्याचा प्रयत्न केला. पचखेडी स्मशानभूमीजवळील टी-पॉईंटवर बोलेरोने जोरदार कट मारल्याने एसडीएम यांची अर्टिगा कार रस्त्यावरून खाली उतरून पलटी झाली. गाडी पलटी होताच परिसरात एकच गोंधळ उडाला. या अपघातात एसडीएम माधुरी तिखे आणि त्यांचे पती दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिक लोकांनी तातडीने त्यांना बाहेर काढले आणि भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचारांसाठी दाखल केले.
घटनेनंतर, एसडीएम यांच्या जबाबाच्या आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारावर भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलीस स्टेशनमध्ये ट्रक आणि बोलेरो चालकांविरोधात हत्येचा प्रयत्न तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत आणि संभाव्य ठिकाणी छापे टाकत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, हा अधिकारी व्यक्तीवर थेट जीवघेणा हल्ला करण्याचा स्पष्ट प्रयत्न आहे आणि प्रशासकीय यंत्रणेला आव्हान देण्यासारखे आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. भंडारा Bhanadra गोंदिया Gondia आणि तिरोडा Tiroda यांसारख्या महाराष्ट्राच्या काही भागात वाळू माफियांना मोठे नेटवर्क सक्रिय आहे. अशाप्रकारे एखाद्या एसडीएमवर झालेला हा पहिला थेट हल्ला असल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली आहे.