चार आरोपी, दोन पिकअप, २५ गोवंश...; पोलिसांची धडाकेबाज कारवाई
पोंभुर्णा:- दिनांक ११ ऑक्टोंबर, २०२५ रोजी उमरी पोतदार पोलीसांना पहाटे गोपनिय माहिती मिळाली की, दोन पिक अप मध्ये गोवंश तस्करी करुन कत्तलीसाठी नेत आहेत यावरुन पोलीस स्टेशन उमरी पोतदार हद्दीत मौजा डोंगर हळदी रोडवर पोलीस स्टॉफ व पंचासह नाकाबंदी करुन दोन पिकअप वाहने थांबवुन पंचासमक्ष तपासणी केली असता सदर वाहनात एकुण २५ नग जनावर (गौवंश) कोंबुन कत्तलीकरीता नेत असल्याचे दिसुन आल्याने आरोपी नामे (१) मंगेश शामराव चौधरी वय २८ वर्ष, रा. लक्कडकोट, (२) राजेश गजानन घोगरे वय २७ वर्ष रा. बेंबाळ (३) मोहम्मद अजीज अली वय २४ वर्ष रा. वाकडी (३) मिर्झा अजीज बेग वय २२ वर्ष रा. वाकडी यांच्याविरुध्द पोलीस स्टेशन उमरी पोतदार येथे कलम ११ (१), (घ), (ङ), (च), (ज) भारताचा प्राण्याणा कुरपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, सहकलम ५ (अ), ९, ११ महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम, कलम ३२५, ३ (५), ९ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात येत असुन आरोपीकडुन महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक TS20-T-4967 आणि MH34-BZ-8425 तसेच सदर वाहनातील एकुण २५ नग जनावर (गौवंश) व चार नग मोबाईल असा एकुण १८,९५,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास उमरी पोतदार पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई श्री मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री सत्यजीत आमले उपविभागीय पोलीस अधीकारी मुल यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन उमरी पोतदारचे सहायक पोलीस निरीक्षक श्री राहुल ठेंगणे यांचे नेतृत्वात पोहवा / ९०८ सुभाष राऊत, पोअं/१३६६ सतीश झाडे, पोअं/२८४१ विनोद चौधरी, पोअं/५७६ राहुल शंखावार, पोअं/११५ सुरज बुजाडे, चापोअं/१२४५ दिनेश देवाडे व पोअं गोपाल घुमडेवाड सर्व पोस्टे उमरी पोतदार यांनी केली आहे. Umari potdar police
जनावरांचे मेडिकल तपासणी तेथे उपलब्ध डॉक्टर कडून करण्यात आली व त्यांच्याकडून सर्टिफिकेट प्राप्त करण्यात आले व सर्व जनावरे प्यार फाउंडेशन येथे जमा करण्यात आली