Top News

गडचिरोलीतील चपराळा येथे सापडल्या प्राचीन वास्तू; उत्खननाची होतेय मागणी. #Gadchiroli

गडचिरोली:- पुरातत्व शास्त्राचा अभ्यासकांना वैनगंगेचा काठावर मौर्य कालीन वास्तुचे अवशेष आढळून आलेत. गोलाकार आकारात असलेल्या या वास्तुचे बांधकाम विटांचे आहे. याच परिसरात लोकवस्ती असल्याचे अनेक खाणाखुणा आढळल्या आहेत.
सापडणारे अवशेष मौर्य कालीन आहेत. या भागाचे उत्खनन झाल्यास गडचिरोली-चंद्रपूरच्या प्राचीन इतिहासावर नव्याने प्रकाश पडू शकतो, अशी शक्यता अभ्यासक निलेश झाडे यांनी वर्तविली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात येणाऱ्या चपराळा येथे वैनगंगेचा काठावर मौर्यकालीन वास्तुचे पुरावे सापडले आहेत. वैनगंगेच्या काठावर असलेल्या धान शेतीत गोलाकार आकारातील ही वास्तु आहे. या वास्तुचे बांधकाम विटांचे आहे.मौर्य काळात आढळून येणाऱ्या विटांचा आकारमान चपराळा येथे सापडलेल्या विटांचा आहे. या वास्तुचा परिसरात मृदभांड्यांचे तुकडे आढळले आहेत.
सापडणारे तुकडे पातळ आणि चमकदार काळ्या रंगाची काळा आणि लाल रंग मिश्रीत असलेली, अब्रकयुक्त गडद लाल रंगाची आहेत. विटांचा वास्तुवर विरगड शिल्प, गणेश शिल्प, शिवलींग ठेवले आहे.याच परिसरात मंदीर बांधकामात वापरणारे कोरीव दगड आढळून आलेत. मौर्य,सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट राजवटीत चपराळा मोठे शहर असावे, असा अंदाज झाडे यांनी लावला आहे. प्राचीन काळापासूनच वैनगंगा नदी पवित्र मानल्या गेली आहे. वैनगंगेचा काठावर ही वास्तु असल्याने याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सापडणारे अवशेषावरून चपराळातील वास्तु बौध्द स्तुप असावा ,असा तर्क झाडे यांनी काढला आहे.
दक्षिणापथावरील महत्त्वाचे शहर.....

प्राचीन मार्ग असलेल्या दक्षिणापथावर चपराळा आहे. नदीचा मार्गाने व्यापारी, प्रवाशी दुरवरून प्रवास करीत असतं.अश्या प्रवाशाचां विसाव्यासाठी वैनगंगेचा काठावर त्याकाळी अनेक शहरे वसली होती. ती शहरे मोठी बाजारपेठ होती. चपराळ्यातील वास्तुचे उत्खनन झाल्यास अनेक बाबीवर प्रकाश पडू शकतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने