संतप्त ग्रामस्थांचे 9 तास 'रास्ता रोको' आंदोलन!
अल्का पेंदोर वय ( ४३) व पांडुरंग पेंदोर पती-पत्नी दोघेही शेतात दिवसभर काम केले. त्यानंतर पांडुरंग हे घराकडे जायला बैलजोडी बंडीने निघाले व अल्का जनावरांसाठी चारा कापतो म्हणून तिथेच थांबली व पांडुरंग घरी पोहोचले असता पत्नी एक तासानंतरही घरी न परतल्याने शेवटी गावकरी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन शोध कुटुंबीयांनी शोध मोहीम राबवली असता वाघाने हल्ल्यात ठार केलेला मृतदेह सापडला. Shivsena ubt
आठवडा भरापूर्वी अवघ्या एका किलोमीटर अंतरावर असलेल्या चेकपिपरी येथे शेतकरी भाऊजी पाल यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सलग दोन हल्ल्यांमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून शेतात जाण्यासही घाबरत आहेत. Chandrapur News
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी गौरकर, क्षेत्र सहाय्यक पुरी, पोलीस उपविभागीय अधिकारी सत्यजित आमले, ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. वाघाच्या शोधासाठी पिंजरे लावून विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे.
दरम्यान, वाघाला जेरबंद करण्याची मागणी तीव्र झाली असून नागरिकांनी वनविभागावर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. आंदोलनादरम्यान सर्व सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, पोलिस उपविभागीय अधिकारी सत्यजित आमले, गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी लघीमा तिवारी, सिसिएफ रामानुज, जिल्हा पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष कुंदा जेणेकर, तहसीलदार शुभम बहाकर, सतीश वासमवार, माजी जि. प. सदस्य संदीप करपे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत नागरिकांना शांततेचे आवाहन केले व कुटुंबियांशी चर्चा करून मार्ग काढून आंदोलन नियंत्रणात आणले. Chandrapur police
तालुक्यात वाढत्या वाघ हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तब्बल नऊ तास राष्ट्रीय महामार्ग नागरिकांनी अढवून धरला वाघाला रेस्क्यू करण्यासाठी शार्प शूटर आल्यानंतरच हे आंदोलन नऊ तासानंतर मागे घेण्यात आले. Tiger Attack

