Vaibhav Pimpalshende: क्रांतिकारी विचाराचा मावळा म्हणजे वैभव पिंपळशेंडे

Bhairav Diwase

"कुछ रास्ता लिख देगा,
कुछ मैं लिख दूंगा!
तुम लिखते जाओ मुश्किल,
मैं मंजिल लिख दूंगा!"

असं एक शायर म्हणतो. खरं तर या शायरीचे शब्द वैभव कुशाबराव पिंपळशेंडे या तरुणावर अत्यंत तंतोतंत जुळतात. कारण वैभव म्हणजे क्रांतिकारी विचाराचा मावळा आहे. कारण तो त्याच्या तत्वाशी कधी काॅम्प्रोमाईज करत नाही. म्हणूनच तर राजकीय क्षेत्रात युवा नेतृत्वाची नामी संधी मिळाली असताना सुद्धा सामान्य व गोर-गरिबांचे काम सत्ताधाऱ्याकडून केल्याच जात नाहीत हि जाणीव होताच त्याने सत्ता व लाटेच्या विरोधात जाऊन परिवर्तनाचा एल्गार पुकारुन जनसामान्यांच्या हितासाठी लढा उभारला. त्याने आपल्या करिअर व प्रोफेशनचा एवढेच नव्हे तर राजकीय कारकीर्दीचा सुद्धा वैभवने विचार केला नाही. समाजाच्या हितासाठी घेतलेला त्याचा निर्णय क्रांतीकारी विचार नाही का...?

वैभव तसा खेड्यातला. पोंभूर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना (कवठी) या छोट्याश्या गावातून त्याची शैक्षणिक व सामाजिक कारकीर्द सुरू झाली. वैभवचे वडील जि.प.शिक्षक त्यामुळे घरात शैक्षणिक वातावरण व डिसिप्लिन होतं. मुलगा शिकला पाहिजे हि धडपड वडिलाची होती मात्र मुलाने आपल्या मर्जीने आपलं करिअर निवडलं पाहिजे हि सुद्धा मुभा होती. वडिलांची जिथे बदली झाली तिथे वैभव सुद्धा फिरत गेला; शिक्षण घेत गेला. एक गाव, मग दुसरा गाव, मग तिसरा गाव.. असं बिराड घेऊन जाणाऱ्या जत्थ्या सोबत मागे मागे जाण्याचा व शिक्षण घेण्याचा अनुभव वैभव ला चांगला आला. तो यातूनही अभ्यासात रमला. त्याला शिक्षणाची गरज काय असते हे समजले होते. कारण वैभवच्या शैक्षणिक पाढ्याची सुरुवातच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षण घेता घेता झाली. चेकठाणेवासना पासून सुरू झालेला शिक्षणाचा प्रवास पिपरी देशपांडे,वेळवा, गोंडपिपरी,चंद्रपूर,नागपूर,पुणे नंतर मुंबई असा झाला.


इंजिनिअरींग चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच त्यानी (एम.बी.ए.)चं ही शिक्षण पुर्ण केलं. आणि लागलीच एका नामांकित साॅफ्टवेअर कंपनीमध्ये त्याने चांगल्या पगाराच्या नोकरीला गवसणी घातली."पुणे तिथे काय उणे" हि वाक्य वैभवच्या डिक्शनरीमध्ये फार काळ टिकून राहिली नाहीत. तीन वर्ष कार्पोरेट नौकरीच्या रोबोटची जिंदगी झाल्यानंतर कोरोना काळात तो आपल्या गावी चेक ठाणेवासण्याला आला. कोरोना काळात लोकांची होत असलेली फरफट, लोकांची आरोग्याशी होत असलेली लढाई पाहून वैभव हादरून गेला. अश्या अडल्या-नडल्या लोकांची कशी मदत करता येईल हे विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. वैभवचे आई-वडिल गावात गरजू लोकांना कोणतीही अपेक्षा न करता मदत करताना वैभवने लहानपणापासून पाहिले होते. त्यामुळे समस्यांवर भाषण न देता कृती केली पाहिजे हे वैभवला चांगलंच समजलं होतं. त्यामुळे जनसामान्यांच्या हितासाठी वैभवने सामाजिक कार्य करण्याचे ठरविले. आणि सुरू झाला वैभवच्या सामाजिक सेवाकार्याचा अध्याय....


वयाची तिशी पार केलेला वैभव पिंपळशेंडे हा उच्च शिक्षित आहे. इंजिनिअरींग, एमबीए चं शिक्षण त्यांनी घेतलं आहे. मनात आलं असतं तर ते एखाद्या एमएनसी कंपनीमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी करून एैशो आरामाची जिंदगी काटू शकले असते. पण त्याच्या नशीबी काही वेगळं लिहलं असेल. वैभव कोरोना काळात गावाकडे फक्त चेंज म्हणून आला होता. मात्र त्याचा जस्ट चेंज हा कधी गावातल्या प्राब्लेमशी मिसळून गेला हे त्याला सुद्धा कळलं नाही. आणि मग सुरू झाला समाजसेवेचं अध्याय. सामान्यांचे प्राब्लेम,अडचणी सोडविण्यासाठी वैभव पुढे येऊ लागला. सुरूवात झाली ती गावापासूनच. मग हळूहळू त्यांने आजुबाजुतल्या परिसरातील समस्यांवर काम करणं सुरू केलं. शेकऱ्यांची समस्या,शेतमजूरांची समस्या,निराधार व अपंग लोकांची समस्या,गावातील रस्ते, पाण्याच्या सुविधा, विद्युत समस्या, खतांची समस्या अश्या अनेक समस्यांवर त्याचं काम करणं सुरू झालं. त्याची काम करण्याची पद्धतच युनिक. तो थेट समस्याग्रस्त व्यक्ती व समस्याला घेऊन प्रशासनाकडे ठान मांडून बसायचा. जोपर्यंत त्यावर तोडगा निघत नाही तो पर्यंत तो निश्चल उभा असायचा कायदा व शासन निर्णयाची पोथडी घेउन. कारण न्याय हे कायद्याने मागायचं असतं हे त्याला माहीत होतं आणि तो कायद्याच्या चौकटीत राहून तो मागणी करायचा. प्रशासनाला प्रश्न करायचं. वस्तूस्थिती काय आहे हे निदर्शनास आणून द्यायचा व काम करायला भाग पाडायचा. त्याच्या याच कार्यपद्धतीने प्रशासनातील अधिकारीही काम करू लागले. या कामाच्या पद्धतीमुळे त्याचं नाव लोकांच्या तोंडा तोंडात घोळू लागला. तालुक्यातील कुणीही वैभवला फोन करून समस्या सांगत सुटू लागला आणि तो त्या समस्या पुर्ण करू लागला. कधी कधी नायलाजाने शासनाच्या विरोधात त्याने मोर्चे काढून जनतेच्या अडचणी सोडवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. यामुळे प्रशासनातील काही मगरगट्ट अधिकाऱ्यांमध्ये भितीचे वातावरणही उमटू लागले होते. यातून फार लगबगीने जनतेची कामे व्हायला लागली. यात वैभवची पुन्हा एक वेगळी ओळख म्हणजे तालुक्यात त्याला आरोग्यदुत म्हणून ओळखले जाते. त्याचं कारणही भक्कम आहे. कुणी अपघातात पडला आहे, कुणी आजारी पडला, कुणाला आरोग्याची समस्या आहे, वैभवला हे दिसलं किंवा माहित पडलं कींवा त्याला ह्याबद्दल कुणी सांगितलं की तो धावून जात असतो. कित्येक अपघातातील लोकांना त्याने स्वतःच्याच कारने दवाखान्यात आणले आहे. एवढेच नव्हे तर रुग्णालयात शववाहिनी नसल्याने व गरीबाला खाजगी गाड्या परवडत नसल्याने त्याने कित्येक मृतदेह दवाखान्यातून घरी नेण्यासाठी स्वतःच आपल्या कारने मृतदेह घरी नेऊन देण्याचे काम केलेला आहे. शासकीय दवाखान्यात गोरखधंदा चालणाऱ्यांची वैभवने चक्क कान उघडणी केली. त्यामुळे काही वैद्यकीय सेवा करतांना गोरखधंदा चालवणाऱ्यांनी तर कानच पकडले. वैभव गरजवंताला रक्तदान करत असतो. कुणाला रक्त लागत असेल तर त्याची तजवीज करून देत असतो. अश्या छोट्या छोट्या कामातूनच वैभवचे नाव तालुक्यात आरोग्यदुत म्हणून घेतल्या जाते.


चेक ठाणेवासना ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांमधून वैभव सुशिक्षित असल्याने ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उभं राहण्याचा आग्रह होऊ लागला. पण या राजकारणात येण्याची आधी वैभवची अजिबात रूची नव्हती. पण त्याची आजी सुनंदा पिंपळशेंडे त्याचे काका प्रभाकर पिंपळशेंडे हे १५ वर्ष गावचे सरपंच म्हणून गाव सांभाळत होते. त्याचीच भुरळ वैभवला पडली असल्याने आणि लोकांच्या आग्रहाखातीर वैभवची राजकारणात एंट्री झाली. वैभव तसा कांग्रेस विचारधारेचा पण दरम्यान तत्कालीन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विकासकामे पाहून व सुधीर मुनगंटीवार यांच्या कामाचा प्रामाणिकपणा बघून त्याने सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश केला. २०२२ मध्ये ग्रामपंचायतची निवडणूक लढली. प्रतिस्पर्धी राजकारणातील मुरब्बी असल्याने व स्थानिय राजकारणात प्रचंड वजन असल्याने वैभवची पहिलीच निवडणूक काट्याची टक्कर ठरली. अवघ्या एका मताने का असेना पण वैभवने निवडणूक जिंकली. सदस्य म्हणून जरी त्यांनी काम सुरू केले असले तरी गावाच्या विकासासाठी अनेक कामे आणण्याचा व कामे करण्याचा सपाटा सुरू केला. गावकऱ्यांना ग्रामसभेतून बोलते करण्याचा काम वैभवने केले. गावकऱ्यांना ग्रामसभेचे महत्व पटवून देण्याचे काम केल्याने गावकऱ्यांनी सुचवलेले व चर्चेत आलेले अनेक कामे पुर्ण झालीत. वैभवचा हौसला आणखीन दृढ होत गेला.


अडल्या नडल्यांना मदत करण्याची त्याची हातोटी प्रभावी ठरत गेली. एका लहानशा गावातून जनतेची सेवा करणारा वैभव पाहता पाहता तालुक्यातील जनतेच्या कामी पडू लागला. जनतेची सेवा करतांना वैभव कडे जनतेचा ओघ वाढला. जनतेच्या सोयी करीता त्यांनी लहानशा गावात एक मोठं कार्पोरेट आफिस तयार केलं. ज्यात सुविधा केंद्राच्या माध्यमातून लोकांची अनेक कामे केली जात होते निःशुल्क व निस्वार्थपणे...


वैभव युवकांच्या हितासाठी अनेक हितैषी कामे केली आहेत. त्याने युवकांचे संघटन करून गावातील स्वच्छतेसाठी, व्यसनमुक्त गावासाठी, पर्यावरण व सांस्कृतिक कार्यासाठीचे त्यांचे योगदान नक्कीच वाखान्यजोगे आहे. ग्रामीण भागातील युवकांनी वाचनसंस्कृती व स्पर्धा परीक्षेकडे वळले पाहिजे यासाठी वैभव पिंपळशेंडे यांनी चेक ठाणेवासना येथे वाचनालय बांधकामासाठी पाठपुरावा केला आणि यात त्यांना यश आले. तत्कालीन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ३० लक्ष रुपयाचे अत्याधुनिक वाचनालय मंजूर केले. वाचनालय पुर्णत्वास आले आहे त्याचा फायदा येथील युवक आपल्या भविष्यासाठी घेतीलच. यासोबतच अनेक खेळाडूंना त्यांच्या खेळ व खेळाडू वृत्तीला बळ मिळावे यासाठी त्यांनी क्रीडा साहित्य आणि व्यायामशाळा उपलब्ध करून सहकार्य केले आहे. आज हि खेडाळू मंडळी वैभव सोबत भक्कमपणे जुडून आहेत. चेक ठाणेवासना येथील रेशन दुकानदाराकडून होत असलेली राशन चोरीच्या विरोधात वैभवच्या नेतृत्वात मोठं आंदोलन उभं राहिलं होतं. साधारण तीनशे ते चारशे लोकं तहसील कचेरीवर धडकली होती. वैभवने हि बाब तहसीलदार यांना पटवून दिल्यानंतर तहसीलदार यांनी संबंधित रेशन दुकानदारावर कारवाई केली होती. हा यश मुळातून वैभवचाच होता. वैभवने चेक ठाणेवासना ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या भूमीहीन,अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर व अत्यंत गरजू व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना शासनाच्या अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्याच्या संदर्भात शासनाकडे मागणी लावून धरली होती. त्याचा सतत पाठपुरावा केला आणि याचा फायदा अनेक लोकांना झाला सुद्धा. लोकांच्या सेवेसाठी वैभव समर्पित आहे. तो यासाठी अथक परिश्रम घेत आहे.

भाजपा पक्षात वैभवचं तसं चांगलंच सुरू होतं पण स्थानिक पातळीवर नवख्यांना स्थान दिल्या जात नसल्याने पक्षांतर्गत मतभेदाचा व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधाचा वैभव बळी पळला. सामान्य व गोर-गरिबांचे काम सत्ताधाऱ्याकडून केल्या जात नव्हते हे दुःखनं वैभवला खुपत होते. शिवाय वैभवची कमी कालावधीत घेतलेली उडी पाहून काही लोकांनी वैभव पक्षविरोधी काम करतो हा ठपका ठेवून वरिष्ठांना सांगत असल्याचे कळल्यामुळे नाराज झालेल्या वैभवने शेवटी पक्ष सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. कारण भाजप हा सत्तेत होता. असं असताना सुद्धा सत्ताधारी पक्षापासून दूर होण्याचा धाडसी निर्णय घेतल्याने अनेकांनी वैभवला असं करू नको..! असा गोड सल्लाही दिला होता. पण वैभव म्हणजे क्रांतीकारी विचारांचा असल्यानेच शेवटी त्याने ज्यांचे विकासकामे पाहून वैभव ज्या पक्षात प्रवेश घेतला होता तो पक्ष त्याने अखेर त्याने सोडला तो कायमचाच. यानंतर अनेक पक्षांनी त्याला आपापल्या पक्षात घेण्यासाठी सहमती दर्शवली होती मात्र काही दिवस वैभवने विचार करून माजी पालकमंत्री तथा विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार व सहकार नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या उपस्थितीत पोंभूर्णा येथे झालेल्या एका जाहिर कार्यक्रमात काॅंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. सत्ता व लाटेच्या विरोधात जाऊन.
जनसामान्यांच्या हितासाठी काँग्रेसमध्ये वैभवने घेतलेला प्रवेश विरोधकांना चांगलाच खुपला होता तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हर्ष उल्हासात त्याचे तालुका काँग्रेस कमेटीत स्वागत केले. वैभवचा युवकांमध्ये असलेला संपर्क व नियोजनबद्ध कार्य पाहून संतोषसिंह रावत यांनी विधानसभेत एक मोठी जबाबदारी सोपवली होती. यादरम्यान त्याला दिलेली जबाबदारी वैभवने उत्तमरित्या पार पाडली.

वैभव सामाजिक कार्य करतो, न्याय हक्कासाठी प्रशासनासमोर भांडतो. त्याचा हा लढा फोटो पुरता, कागदापुरता राहत नाही किंवा एखाद्या न्यूजपेपरच्या हेडिंग पुरता राहत नाही तर प्रामाणिक प्रयत्नांना न्याय देण्यासाठी असतो. असंच उदाहरण म्हणजे चेक ठाणेवासना ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या टोक गावातील समस्यांना व समस्याग्रस्त लोकांना न्याय देणारा एक उदाहरण. स्वातंत्र्याची पंचाहत्तरी पार करून सुद्धा या गावात एकही घरकुल योजना सुरू झाली नव्हती. किंबहुना शासनाने या योजनाच टोक या गावात दिल्या नव्हत्या. दरिद्र रेषेखाली जगणाऱ्या व मासेमारी करून आपलं पोट भरणाऱ्या ढिवर (भोई) समाजाकडे कुणी नेता लक्षच देईना. अशावेळी वैभवने टोक गावातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मंत्री, आमदार, खासदार व प्रशासनातील मोठ-मोठ्या अधिकाऱ्यांकडे हा विषय उचलून धरला आणि या प्रयत्नांना यशही आले. टोक गावात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून एक्कावन घरकुल मंजूर झाले. त्याचे कामही सुरू झाले आहेत. टोकवासियांचे दुर्भाग्य एवढ्यावरच थांबले नव्हते तर या ठिकाणी दोन नद्या असताना सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना मोठी पंचाईत व्हायची. पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना बाराही महिने नदीवरच्याच पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. एव्हना पावसाळ्यात सुद्धा अगदी दुथडी भरून नदी वाहत असताना सुद्धा ते तिथूनच पिण्यासाठी पाणी नेत असायचे. हे भयान वास्तव पाहून वैभवनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या समवेत पंचायत समितीवर मोठे जनआंदोलन उभे केले. यादरम्यान न्याय मागतांना अधिकाऱ्यावर गढुळ पाणी फेकण्याच्या कारणावरून त्याचेवर गुन्हे दाखल झाले आहेत. पण तो मागे सरकला नाही किंवा गुन्हा व शिक्षेच्या गोष्टीला घाबरलेला पण नाही. शेवटी शासनाने या गंभीर समस्येची दखल घेत गंगापूर व टोक या दोन्ही गावात तात्काळ जलशुद्धीकरण केंद्र सुरू केले. हे यश पाहून वैभवच्या फायटर स्पिरीटची तारीफ केल्या खेरीज राहवत नाही. जिथे प्राब्लेम तिथे वैभव अशी ओळख तालुक्यात निर्माण झाली आहे. म्हणूनच की काय वैभवने सुद्धा एक वाक्य रूढ केलं तो म्हणजे - "एक काॅल प्राब्लेम सॉल्व". या छोट्याशा आयडिलाॅजीमुळे अनेकांची कामे झाली व अनेकांना त्याचा फायदाच झाला आहे. वैभवची आई वैभवला नेहमी म्हणायची की एवढा व्याप वाढवून घेऊ नकोस. पण जेव्हा वैभवकडे वृद्ध,गरजू लोकं अपेक्षा घेऊन घरी यायचे व त्यांचे काम होतांना बघून वैभवच्या आईच्या डोळ्यात आपसुकच आनंदाश्रू यायचे. त्यावेळी आई म्हणून मुलांबद्दलचा गर्व आपोआप येत असतो. वडीलही वैभवच्या राजकीय कारकीर्दीला चालनाच देत आहेत. लढ म्हणण्याची ताकद सुद्धा देत आहेत.

सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहिर झाल्या आहेत. सर्वच पक्षानी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अश्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे निकटवर्ती असलेले इंजी. वैभव पिंपळशेंडे यांना कांग्रेसची अधिकृत उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याला उमेदवारी मिळावी असे लोकांनाही वाटते. तो निवडणूकीत उतरला की त्याचा विजय नक्कीच आहे अशी पाठीवर थापही लोकं देत आहेत. त्यामुळेच वैभव लकी असल्याचे बोलल्या जात आहे. यात आणखी म्हणजे चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचाही वैभवला आशिर्वाद लाभला आहे. राजकारणात जय पराजय लागलेलं आहे. यातून माणसाची स्ट्रैन्थ माहित होते. वैभवला जय पराजयाचं काही एक लेनदेण नाही. कारण तो जिंकण्यासाठीच उतरला आहे. त्यामुळे व्ही *"फाॅर व्हिक्टरी, व्ही फाॅर वैभव"* अशी एक ओळख पुन्हा त्याच्या नावासमोर पंचायत समितीच्या निवडणूकीच्या निमित्ताने नक्कीच कोरल्या जाईल.