Top News

चंद्रपूरच्या नगरसेवकावर अज्ञात युवकांचा हल्ला #attack #Corporator

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून भाईगिरीत वाढ झाली आहे. लहानसहान बाबी वरून मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होत आहे. काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष व नगरसेवक नंदू नागरकर सकाळच्या सुमारास फिरायला गेले असता मित्रासोबत गप्पा-गोष्टी करून परत येत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सूत्राच्या माहितीनुसार चंद्रपूर शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ आपल्या दुचाकीने जात असताना अज्ञात व्यक्ती हा सुसाट वेगाने वाहन चालवीत असल्याचे दिसून आल्याने नंदू नागरकर यांनी त्यास हटकले असता तो व्यक्ती नागरकर यांचेशी वाद घालू लागला त्यानंतर या व्यक्तीने आपल्या २ मित्रांना बोलावून घेतले व नागरकर यांचा रस्ता अडवून त्यांना मारहाण करू लागले व त्यानंतर सदर ३ ही व्यक्ती पळून गेले.
रक्तबंबाळ अवस्थेत नागरिकांनी नंदू नागरकर यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले ओळख पटू नये म्हणून सदर व्यक्तींनी आपला चेहरा झाकलेला होता. चंद्रपूर महानगरपालिकेच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर नंदू नागरकरावर झालेला हल्ला हा कुणाच्या निर्देशावरून तर नाही झाला ना अशा अनेक तर्क-वितर्काना उधाण आले आहे मात्र या हल्ल्यात नागरकरांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने