Top News

समाजाच्या उद्धारासाठी महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारावर चालण्याची गरज! #Pombhurna

डॉ. अभिलाषा बेहेरे-गावतुरे यांचे प्रतिपादन
पोंभुर्णा:- तालुक्यातील डोंगरहळदी येथे अखिल भारतीय माळी महासंघा तर्फे आयोजित राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांची 195 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक डॉ. अभिलाषा बेहेरे- गावतुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच मीनाताई ढोले, प्राची वेल्हेकर मॅजिक बस तालुका समन्वयक, निशा मोहूर्ले , श्रीकांत शेंडे यांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रम पार पडला.
आजपासून 195वर्षांपूर्वी महात्मा जोतिबा फुले नावाच्या महामानवाचा जन्म झाला. रूढी परंपराच्या चिखलात समाज रुतलेला असतानाही महात्मा फुले आणि ज्ञानज्योती माईसह शिक्षण आणि समानतेच्या हक्कासाठी त्याकाळी संघर्ष केले. त्या काळातील या गुलामगिरी ढवळून निघाली तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केले. रूढी परंपरेच्या विरोधात अशा प्रकारे विरोध करण्याची कल्पनाही कोणीही केली नसेल. भारताच्या इतिहासातील ही पहिली शाळा होतो.
महात्मा फुले यांनी1848 ते 1892 या कालखंडामध्ये संबंध स्त्रीवर्ग डोळ्यासमोर ठेऊन महत्वाचे कार्य केले. ज्यावेळी युरोपियन देशामध्ये स्त्रीला मतदानाचा हक्क द्यायचा की नाही यावर चर्चा व गदारोळ सुरू होती.त्या वेळेस भारतातील स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देखील नाकारलेला होता. महात्मा फुलेंच्या मते स्त्रीही कोणत्याही जाती व वर्गातील असो तिला भेदभावला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी व माणूस म्हणून जगता यावे यासाठी स्त्री शिक्षणासाठी दारे खुले केली. या समाजाच्या उद्धहरासाठी सत्यशोधक समाजद्वारे एक नवीन समाज व्यवसंस्थेची निर्मिती केली. आणि आपले लग्ने व इतर कार्यक्रम हे सत्यशोधक पद्धतीने व्हावे या हेतूने सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि आता आपल्याला समाजाच्या उद्धारासाठी महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारावर चालण्याची गरज आहे असे प्रतिपादन डॉ. अभिलाषा बेहेरे गावतुरे यांनी केले.
त्यानंतर इतर मान्यवरांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवन पठावर उजाळा देत संबोधित केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन जनार्धन लेनगुरे तर आभार विजय ढोले यांनी मानले.यावेळी अखिल भारतीय माळी महासंघाचे कार्यकर्ते निशाल मेश्राम, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, गणेश वाढई, निळकंठ गुरनुले, एकनाथ लेनगुरे, लखन कुसराम, प्रेमदास उंदिरवाडे, वासुदेव चौधरी, नितेश ढोले, कार्यक्रमाच्या यशस्वीत्यासाठी परिश्रम घेतले. तर त्यावेळी गावातील कष्टकरी शेतकरी व समाजबांधव शेकडोच्या संख्येने नागरिक उपस्थिती होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने