मुल:- शेतीसंदर्भातील ऑनलाईचं काही कामकाज घेऊन बाप-लेक निघाले होते. काम आटोपून दोघेही हसत खेळत घराकडे परत निघाले. मात्र, मृत्यू त्यांच्यावर टपून होता. विरुध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीने समोरासमोर धडक दिली. या धडकेत बाप-लेक जागीच ठार झाले. तर दुसऱ्या दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मूल-मारोडा मार्गावर घडली. यश शेंडे, देविदास शेंडे आणि वासुदेव सहारे असं मृतकांची नावं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शेती संदर्भातील ऑनलाईन काम करण्यासाठी यश शेंडे आणि देविदास शेंडे हे दोघं बापलेक मारोडा येथून दुचाकीने मुलला गेले होते. कामं आटोपून ते दोघे गावाकडे निघाले. याचदरम्यान भादुर्णा येथील वासुदेव सहारे हे मूलकडे निघाले होते. मूल-मारोडा मार्गावरील बल्की देवजवळ या दोघांच्या दुचाकीने एकमेकांना समोरासमोर धडक दिली. या धडकेत यश शेंडे आणि देविदास शेंडे या बाप-लेकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर वासुदेव गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.