Chandrapur News: जीवघेणे खड्डे, रस्त्यासाठी निधी नाही त्याच ठिकाणी ३.५ कोटींचे रस्ता दुभाजक बनणार

Bhairav Diwase
चंद्रपूर:- बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज ते पुढे बल्लारपूर मार्गापर्यंत जागोजागी जीव घेणे खड्डे आहेत. या मागनि बाबूपेठ, भिवापूर वार्ड, लालपेठ इत्यादी भागात राहणारे नागरिक तसेच दोन्ही इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी वेकोलीचे कर्मचारी, शालेय विद्यार्थी हजारोंच्या संख्येने जाणे-येणे करतात. या मागांवरील खड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. हजारो चंद्रपूरकरांना यामुळे मानेचा मणक्याचा त्रास तसेच पाठदुखी व श्वसनाचा आजार अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. तातडीने या रस्त्याचे काम करणे अत्यंत गरजेचे आहे. एका बाजूला ५० ते ६० मीटर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम झाले. परंतु निधी अभावी उर्वरित काम रखडले.


काही दिवसांपूर्वी या रस्त्यावरील मजबूत व चांगल्या स्थितीत असलेले दुभाजक तोडण्याचे काम महानगरपालिकेने सुरू केले. अखेर रस्त्याचे काम सुरू झाले म्हणून नागरिकांनाही समाधान वाटले. या कामाला होत असलेला विलंब व त्यामुळे होणाऱ्या त्रासाची तक्रार करण्यासाठी एका स्थानिक नागरिकाने माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्याशी संपर्क केला. देशमुख यांनी सदर कामाबाबत माहिती घेण्यासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा या ठिकाणी रस्त्याचे काम नव्हे तर केवळ रस्ता दुभाजकाचे काम होत असल्याची धक्कादायक माहिती देशमुख यांना मिळाली. ३ कोटी ५६ लक्ष रुपयांच्या निधीतून शहरात ३०० ते ४०० मीटर लांबीचे दोन रस्ता दुभाजक तयार होणार आहेत. त्यावर काही झाडे लावणे व पाच वर्षाची देखभाल-दुरुस्ती याचा समावेश आहे.


ऑक्टोबर २०२४ मध्ये या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. एप्रिल २०२५ मध्ये मेसर्स सूर्यवंशी एंटरप्राइजेस या एजन्सीला कार्यारंभ आदेश देण्यात आला. 


प्रदूषण नियंत्रणासाठी आलेल्या निधीचा पुन्हा गैरवापर

चंद्रपूर हे प्रदूषित शहर असल्यामुळे केंद्र सरकारकडून राष्ट्रीय शुद्ध व कार्यक्रमांतर्गत दरवर्षी प्रदूषण नियंत्रणासाठी येतो. हवेचा दर्जा सुधारण्यासाठी धूळ कमी करण्यासाठी विविध कामे याअंतर्गत केली जातात. नागरिकांचे आरोग्य प्रदूषणामुळे बाधित होऊ नये हा शासनाचा हेतू आहे. राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत २०२२-२३ ला मिळालेल्या निधीतून सव्वादोन कोटी रुपयांचा फाउंटेन घोटाळा करण्यात आला होता. २०२४-२५ ला मिळालेल्या निधीतून दोन रस्ता दुभाजक तोडून नवीन दुभाजक तयार करण्यात येत आहे.


नागरिकांच्या आरोग्यासाठी कामे करता आली असती

मनपाकडे सध्या संपूर्ण शहरासाठी पाण्याचे फवारे सोडणारी ५० लक्ष रुपये किमतीची एक मोठी फॉगर मशीन आहे. अशा दोन मशीन घेऊन प्रत्येक झोनला एक मशीन देणे शक्य झाले असते. या मशीनने शहरातील धुळीवर नियंत्रण मिळवता येते. ३० लक्ष रुपये किमतीच्या तीन छोट्या स्विपिंग व एक कोटी रुपये किमतीची मोठी स्विपिंग मशीन आहे. यामध्ये भर घालता आली असती. एवढेच नव्हे तर रस्ता देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली बागला चौक ते राजीव गांधी इंजीनियरिंग कॉलेज पर्यंत रस्त्याचे कामही करता आले