जाहिरात... Advertisement... विज्ञापन

दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू #chandrapur


पोंभूर्णा :- उमरी पोतदार येथून आंबई तुकूम गावाकडे जात असताना आंबेधानोरा- उमरी पोतदार मार्गांवरील छोट्या पुलाजवळ दुचाकीवरचा ताबा सुटला व पुलीयाच्या लोखंडी सुरक्षा कठड्याला आदळल्याने दोघांचा अपघाती मृत्यू झाला.
सदर घटना दि.१४ एप्रिल ला संध्याकाळी ५:३० वाजता घडली. मृतांमध्ये उमरी पोतदार येथील बंडू गोपाळा येळमे वय ४२ वर्ष व टेंभूरवाही ता.राजुरा येथील कैलास देवाजी कोडापे वय ३५ वर्ष यांचा समावेश आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे कैलास कोडापे हा आपला मेहुणा बंडू येळमे याला भेटायला आला होता. काम आटोपल्यावर बंडू येळमे हा मेहुण्याला आंबई तुकूम येथे आपल्या हिरो होंडा स्प्लेंडर (एम. एच. ३४- एस- ८७४२) दुचाकीने सोडायला जात असताना उमरी पोतदार व आंबेधानोरा मार्गावरील छोट्या पुलाजवळ दुचाकीवरचा ताबा सुटल्याने पुलीयाच्या लोखंडी सुरक्षा कठड्याला आदळल्याने दोघेही उसळून खाली कोसळले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली व त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
सदर घटनेचा तपास उमरी पोतदारचे ठाणेदार किशोर शेरकी यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार दिपक कुंभरे, सुनील तायडे, संदिप चुधरी, मोहनिश गेडाम करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत