गळफास घेऊन युवकाची आत्महत्या #chandrapur #bhadrawati #suicide

Bhairav Diwase


भद्रावती:- शहरातील हनुमाननगर (Hanumannagar) येथे राहणाऱ्या युवकाने राहत्या घरी गळफास (hanging) घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी (police) मार्ग  दाखल केला आहे.
बल्लारपूर रेल्वे स्टेशनचा उडानपुल कोसळला

आकाश विलास सातपुते (वय २५ वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून आकाश (Akash) व्यसनाधीन झाला होता. त्यामुळे त्याची पत्नीसुद्धा त्याला सोडून गेली होती.

शनिवारी दुपारी त्याच्या आई- वडिलांनी दरवाजा का उघडत नाही म्हणून त्याच्या रूममध्ये बघितले असता तो दोराच्या साहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास भद्रावती (Bhadrawati) पोलीस करीत आहेत.