संविधानाची उद्देशिका हा भारतीय राज्यघटनेचा आरसा:- उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार #chandrapur

Bhairav Diwase

संविधान दिनानिमित्त सरदार पटेल महाविद्यालयात राज्यघटनेच्या उद्देशिकेचं वाचन


चंद्रपूर:- दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर हा दिवस भारताच्या लोकशाही (Democracy of India) इतिहासात अतिशय खास मानला जातो. या दिवशी भारतीय लोकशाहीचा पाया (foundation) रचला गेला.

या दिवशी भारताच्या स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या संविधान सभेने (Constituent Assembly) 1949 मध्ये राज्यघटना स्वीकारली. भारतात दरवर्षी आजचा दिवस संविधान दिवस (Constitution Day of India) म्हणून साजरा केला जातो.


भारतीय संविधान दिनानिमित्त सरदार पटेल महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान पुस्तकांचे पूजन करून विद्यार्थी व प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसोबत संविधान उद्देशिकेचे सामूहिक पद्धतीने वाचन केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, क्रिडा अधिकारी राजू वडते, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.‌ कुलदीप आर. गोंड, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. विजय सोमकुंवर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. उषा खंडाळे, NCC प्रमुख डॉ. सतिश कन्नाके, हनुमंतू डंबारे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, स्वयंसेवक, स्वयंसेविका, NCC कॅडेट, खेळाडू तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार यांनी म्हणाले की, संविधानाची उद्देशिका हा भारतीय राज्यघटनेचा आरसा आहे. घटनेने बहाल केलेले मूलभूत अधिकार, त्यांच्यामुळे नागरिकांचा वैयक्तीक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठीची उपयुक्तता आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या भारतीय राज्यघटनेचा नागरिकांचे स्वातंत्र्य हा प्राण आहे. तसेच न्यायालयांचे स्वातंत्र्य आपण प्रतिष्ठेने जपले पाहिजे. जीवन आणि स्वातंत्र्य कायद्याचा मूळ आधार आहे. भारतीयांच्या आशा आकांक्षेचे प्रतिक असलेली राज्यघटना प्राणपणाने जपली पाहिजे. घटनेने दिलेले मूलभूत अधिकार. पैसा. भाषा. जात. पद यामुळे जाता कामा नयेत. प्रामाणिक, चारित्र्यवान लोकांनी घटनेचे पावित्र्य सांभाळले तर देशाची लोकशाही बळकट होईल.