प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी ट्रॅव्हल्स उलटली #chandrapur #gadchiroli #accident


३ गंभीर, १५ किरकोळ जखमी


कोरची:- कोटगुलवरून-वडसाला प्रवासी घेऊन जाणारी खासगी बस चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याकडेला बांधीत जाऊन उलटली. या अपघातात ३ प्रवासी गंभीर तर १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ दरम्यान बेडगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत घडली.

माहितीनुसार, कोटगूलवरून आकाश ट्रॅव्हल्स ३५ ते ४० प्रवासी घेऊन वडसाकडे जात होती. दरम्यान, कोरचीपासून ३ किमीवर असलेल्या बेडगाव वळणावर वाहनाचे एक्सेल तुटल्याने चालक धर्मेंद्र नारद फुलारी यांचे बसवरून नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स सरळ बांधीत जाऊन उलटली.

या घटनेत दीपिका सोनू शिकारी (२५) रा. देवरी, ता. रतनपूर, जि बिलासपूर (छत्तीसगड), आम्रपाली गोकुळ जांभुळकर (३६) रा. चपराड, ता. लाखांदूर, जि.भंडारा, कोरची आश्रम शाळेतील कामाठी आनंदराव नारायण मरापे (५८) हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

तर, १५ किरकोळ जखमींमध्ये बोरी येथील पोस्टमास्टर निकिता टेंभुर्णे (२१), श्यामलाल रामजी पुरामे (६५) रा.सोनपूर, शांताबाई ठाकुराम मडावी (३५) रा. कोरची, ललिता नारायण पडोटी (४०) सोनपूर, कुमारी अरविंद गावळे (३०) नांदनी, रामदास पांडुरंग जांभुळकर (७०) रा. चपराड, अरमान सोनू शिकारी (२) रा. शिराजपूर, जयाबाई गणेश धुर्वे (६८) रा. कुरखेडा, रसिका रामदास जांभुळकर (६७) रा. चपराड, रामचंद्र दुनियाजी तांडेकर (७५) रा. बेडगाव, निकिता विशाल टेंभुर्णे (२१) वर्षे रा. बोरी, नीलम मनोज मडावी (२१) वर्ष रा.मोहगाव, रचना सोनू शिकारी (०७) रा. शिराजपुर, मनोज सुधाराम मडवी (२५) वर्ष रा. मोहगाव, नंदिनी सोनू शिकारी (३४) वर्ष रा. शिराजपुर, रंन्तु शिवकुमारी शिकारी (४०) वर्ष रा. शिराजपुर यांना कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच बेळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. व जखमी प्रवाशांना ट्रॅव्हलमधून बाहेर काढून कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. या प्रकरणी कोरची पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत