शिवराज राक्षे बनला महाराष्ट्र केसरी #chandrapur #pune


फायनलमध्ये महेंद्र गायकवाडला पराभूत करत पटकावली मानाची गदा


पुणे:- कुस्ती महर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरी, पुणे येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023 पार पडली. शनिवार (14 जानेवारी) रोजी या स्पर्धेची अंतिम लढत गादी विभागातील विजेता शिवराज राक्षे आणि माती विभागातील विजेता महेंद्र गायकवाड यांच्यात झाली.

 प्रेक्षकांची खचाखच भरलेल्या क्रीडांगणात अत्यंत चुरशीच्या झालेल्या किताबी लढतीत शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाड याला चितपट करत करत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. शिवराज राक्षेच्या रुपाने कुस्ती क्षेत्राला नवा महाराष्ट्र केसरी मिळाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत