संमेलनातून पर्यावरणाचे कार्य वृद्धिंगत व्हावे:- ना. सुधीर मुनगंटीवार #chandrapur


पर्यावरण संमेलनाचे थाटात उद्घघाटन
 
मराठी सिने अभिनेता जयराज नायर, ॲड. वामनराव चटप, ॲड. संजय धोटे, राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस यांची उपस्थिती.


राजुरा:- मानवाने सदैव आपल्याला भरभरून देणाऱ्या निसर्गाला ओरबडून टाकले आहे. विकास करीत असतांना बेछूट पणे पर्यावरणाचा -हास आपण करतो. प्रदूषणमुळे आता मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. आता याचे भान ठेऊन वृक्षाचे संवर्धन करण्याची ऊर्मी प्रत्येक व्यक्तीला झाली पाहिजे. आपल्या मानवजातीच्या सुरक्षिततेसाठी पुन्हा निसर्गाचे, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी या संमेलनातून विचारमंथन होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरण संवर्धन करण्याच्या दृष्टीने श्रीगणेशा होवो, अशी सदिच्छा व्यक्त करीत कार्यक्रमाचे उद्घघाटक राज्याचे वने, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रदूषण, पर्यावरण, वृक्षारोपण याविषयी आपले विचार सविस्तरपणे मांडले.


राजुरा येथे दिनांक 13 जानेवारीला पहिले विदर्भ स्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन नैसर्गिक पर्यावरण, संवर्धन व मानवता विकास संस्थेने स्थानिक साईराम मंगल कार्यालयात केले. या कार्यक्रमाचे उद्घघाटन ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुयोग धस होते. प्रमुख अतिथी माजी आमदार ॲड. वामनराव चटप, माजी आमदार ॲड. संजय धोटे, अभिनेते जयराज नायर, सुरेश धस, सिद्धार्थ पथाडे, सुरज ठाकरे, भूषण फुसे, सतीश धोटे, दीपक भंवर, सचिन वाघ, सोमनाथ कुताळ, अमित सूर्यवंशी, महेंद्रसिंह चंदेल, हेमंत आगवणे, उपस्थित होते. स्वागताध्यक्ष माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी मान्यवरांचे हस्ते रजनी शर्मा यांनी संपादन, संकलन केलेल्या संमेलन विशेषांक आणि डॉ. प्रिती तोटावार लिखित " निसर्ग माझा सखा " पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.


       माजी आमदार ॲड. चटप आपल्या भाषणात म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल ठेवण्याची आता नितांत गरज निर्माण झाली आहे. कोरोना काळात ऑक्सीजनचे मानवी जीवनात किती स्थान आहे, हे सर्वांच्या निदर्शनास आले आहे. मात्र विकास करीत असतांना बेछूटपणे पर्यावरणाचा -हास आपण करतो, ग्लोबल वॉर्मिगचे मोठे संकट आपल्यापुढे आहे. पर्यावरण विषयक अनेक कायदे असले तरी आपण प्रत्येकाने आपल्या घरातून पर्यावरण संरक्षणाचा वसा घेऊन निसर्गाचा समतोल राखला पाहिजे. विकास करीत असताना नुकसान झालेल्या वनापेक्षा दुप्पट क्षेत्रात वृक्ष लागवड करून पर्यावरणाचे नुकसान भरून काढले पाहिजे मात्र सोबतच शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाचे स्वागत केले पाहिजे, असे मत माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.
             
       या संमेलनात पर्यावरण व मानवता विकासाचे कार्य करणाऱ्या राज्यातील कार्यकर्त्यांना निसर्ग मित्र पुरस्कार अरुण तिखे, संतोष थिपे,चंद्रपूर, सुरेश येलकेवाड, राजुरा, बाळ काळणे, अकोला, आशिष इंगळे, अमरावती, डॉ. रूपाली बिर्ला, नाशिक, संध्या रामागिरवार, यवतमाळ, यशश्री उपरीकर,भंडारा, दिलीप सदावर्ते, भास्कर करमनकर, राजुरा , पर्यावरण भूषण पुरस्कार नागपूर येथील डॉ. स्मिता गुडधे , डॉ. समीर देशपांडे, बाल निसर्ग मित्र पुरस्कार राम ढोके , युवा प्रेरणा पुरस्कार कु. राधिका दोरखंडे , सेवाभावी संस्था छावा फाउंडेशन, प्यार फाउंडेशन, जीवनदिप पर्यावरण व सर्पमित्र संस्था यांचा मान्यवरांचे हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राचे प्रास्ताविक संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, संचालन वज्रमाला बतकमवार व मोहनदास मेश्राम आणि आभार प्रदर्शन डॉ. प्रीती तोटावार यांनी केले.दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन स्वाती देशमुख, स्वाती मेश्राम यांनी केले. प्रास्ताविक अल्का सदावर्ते यांनी तर आभार तेजस्विनी नागोसे यांनी मानले. कार्यक्रमात स्वरप्रिती अकादमीच्या अल्का सदावर्ते आणि चमुने सुंदर स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमापूर्वी सकाळी संविधान चौकातून भव्य वृक्षदिंडी निघाली. यात विविध शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले. या संमेलनात नागपूर विभाग अध्यक्ष, विजय जांभुळकर, संतोष देरकर, रजनी शर्मा, दिलीप सदावर्ते, सुनैना तांबेकर, राजश्री उपगन्लावार, बबलू चव्हान, रुपेश चिडे, आशिष करमरकर,संदीप आदे, सचिन मोरे, अंजली गुंडावार, आकाश वाटेकर डॉ.सुरेश उपगन्लावार, डॉ.उमाकांत धोटे, कोकण विभाग अध्यक्ष बापू परब, यवतमाळ विभाग अध्यक्ष विलास चौधरी, सर्वांनंद वाघमारे, सुरज गव्हाणे, रवी बुटले, स्वतंत्रकुमार शुक्ला, कविता शर्मा, प्रणाली मांडवकर, वीणा देशकर, स्वरूपा झंवर, माणिक उपलांचिवार, यांचे सह राज्यातील व विदर्भातील पर्यावरणप्रेमी, नागरिक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या