सर्किट हाउस परिसरात पोलिसांची मॉक ड्रिल #chandrapur #gadchiroli #police #Morkdrillगडचिरोली:- प्रत्यक्ष कधी दहशतवाद्यांचा हल्ला झालाच तर पोलिस जवानांना अनुभव असावा यासाठी त्यांचा सराव व्हावा म्हणून शुक्रवार (ता. १३) स्थानिक सर्किट हाउस परिसरात मॉक ड्रिल करण्यात आली.

स्थानिक सर्किट हाउस विश्रामगृहात दहशतवाद्यांनी दोन व्हीआयपींसह काहीजणांना ओलिस ठेवले आहे, असे नाट्यरूपांतरण करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी प्रत्यक्ष हल्ला झाल्यास करण्यात येणारी सर्व प्रक्रिया पार पाडली.

गडचिरोलीत सर्किट हाऊसचा निर्मनुष्य परिसर अचानक पोलिस जवानांच्या चपळ हालचालींनी गजबजला. या परिसरात जवानांनी वेढा दिला. पोलिस अधिकारी बॉम्बशोधक पथकासह पोहचले. दहशतवाद्यांनी सर्किट हाऊसचा कब्जा घेतला, असे चित्र निर्माण करण्यात आले. पोलिस जवानांनी विश्रामगृहात प्रवेश करून दोन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर एक जण जखमी झाल्याचे दाखवत तथाकथित ओलिसांची सुटका यशस्वीपणे केली.

हे सर्व एका चित्रपटातल्या कथानकासारखे करण्यात आले. हा गडचिरोली पोलिसाच्या मॉक ड्रिलचा भाग आणि सराव असला, तरी परिसरात काही वेळासाठी प्रत्यक्षच हल्ला झाल्यासारखे वातावरण निर्माण झाले होते. या अभियानाचे नेतृत्व माओवादविरोधी अभियानाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनुज तारे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कुमार चिंता आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत