13 वर्षाच्या मुलाचा भयानक मृत्यू
नागपूर:- पतंग पकडताना आयुष्याचा दोर कापला गेला आहे. पतंग उडवण्याची हौस एका मुलाच्या जीवावर बेतली आहे. पतंगीच्या मागे धावताना एका 13 वर्षाच्या मुलाचा भयानकरीत्या मृत्यू झाला आहे. नागपुरमध्ये ही घटना घडली आहे.
कुंभारटोली लगतच्या रेल्वे ट्रॅकवर ही घटना घडली. पतंग पकडण्याचा नादात 13 वर्षीय मुलाचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. ध्रुव धुर्वे असं या 13 वर्षीय मुलांचं नाव आहे. ध्रुव हा कुंभारटोली परिसरात राहतो. सध्या जिकडे तिकडे पंतग उडवणे सुरू असून पतंग पकडण्याचा नादात ध्रुव रेल्वे ट्रॅकवर धावत गेला तेवढ्यात मागून आलेल्या यशवंत एक्स्प्रेसने त्याला जोरदार धडक दिली. रेल्वेच्या धडकेत ध्रुवचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी गर्दी झाल्यानं धंतोली पोलीस पोहचले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.