चंद्रपूर:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) महाराष्ट्रातील (Maharashtra) सागवन काष्ठ प्रभू श्रीरामचंद्रांच्या (Lord Shri Ram) अयोध्येला (Ayodhya) आज रवाना होणार आहे. रामायणात (Ramayana) ज्या दंडकारण्याचा उल्लेख आहे. त्या दंडकारण्याचा भाग असलेल्या चंद्रपूरमधील (chandrapur) सागवन काष्ठ अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या (Shri Ram Temple) निर्माण कार्यासाठी वापरले जाणार आहे. हे काष्ठ पाठविण्याचा आनंदोत्सव चंद्रपूर (chandrapur) आणि बल्लारशामध्ये Ballarpur आज साजरा होणार आहे.
या काष्ठपूजन सोहळ्याला श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रचे कोष्याध्यक्ष आचार्य गोविंददेव गीरी महाराज, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Deputy Chief Minister of Maharashtra Devendra Fadnavis) शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उत्तर प्रदेशचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. योगेंद्र उपाध्याय, स्टॅम्प न्यायालय शुल्क राज्यमंत्री श्री रविंद्र जायस्वाल, वन पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. अरुणकुमारजी सक्सेना, अभिनेते अरुण गोवील, सुनील लहरी,अभिनेत्री दिपीका चिखलिया या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (State Forest and Cultural Affairs Minister and Chandrapur Guardian Minister Sudhir Mungantiwar) यांनी पत्रकार परिषदेत (press conference) दिली.
काष्ठपुजन, शोभायात्रा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची जय्यत तयारी झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास दोन हजार कलावंत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, असेही ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. दुपारी ३.३० वाजता बल्लारपूर एफडीसीएम डेपोमध्ये काष्ठपुजन होईल. त्यानंतर चंद्रपूर येथील माता महाकाली मंदिरापासून प्रभू श्रीरामाच्या मंदिरापर्यंत शोभायात्रेचे आयोजन होईल. रात्री ९.३० च्या सुमारास चांदा क्लब ग्राऊंड शोभायात्रेचा समारोप होणार आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी रात्री ९.३० वाजता सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचा रामधून व राम भजनाचा कार्यक्रम होईल.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी चंद्रपूर शहर आणि बल्लारपूर शहर सज्ज झाले असून, ठिकठिकाणी होणाऱ्या शोभयात्रेसाठी स्वागतकमानी, पताका, भगवे झेंडे लावण्यात आले असून मार्गावर रामधून सुरू असून वातावरण राममय झाले आहे. आयोजनासाठी शेकडो कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने या परिश्रम घेत आहेत.
#Chandrapur #Maharashtra #gadchiroli #India #Adharnewsnetwork #bhairavdiwase #police #yawatmal #Gondwanauniversitygadchiroli #SardarPatelmahavidyalayachandrapur #spcollegechandrapur #tataIPLmatch #ipl #ilplive #GTVsCSK #SudhirMungantiwar, #DevendraFadnavis, #Nagpur, #DeepakKesarkar, #Shobhayatra, #Ballarpur, #UttarPradesh, #Ayodhya, #ShriRamTemple, #ShriRamTempleAdministration,
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
Display ads.
"आधार" नव्या दमाने वाचकांच्या सेवेत.....
एकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)
MGid ads.
वैशिष्ट्यीकृत पोस्ट
लोकप्रिय पोस्ट
Slideshow News 2
Whatsup group
सन्मानचिन्ह
आधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..
Mgid ads.
लोकप्रिय पोस्ट
प्रतिनिधी पाहिजे....
चंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.
इच्छुकांनी संपर्क साधावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत