Top News

‘फ्लिपकार्ट’च्या ऍनिव्हर्सरी निमित्त फ्री गिफ्ट मिळवण्याची संधी लिहिलेल्या लिंकवर क्लिक करू नका!#Chandrapur

सावधान... सावधान... सावधान...


‘फ्लिपकार्ट’ कंपनीने १७ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व्हे करत असून त्याद्वारे फ्री गिफ्ट मिळवण्याची संधी असल्याचे दर्शवत व्हॉट्सऍपवर काही लिंक्स व्हायरल होताना दिसत आहेत. 

Source: Whatsapp

या फ्लिपकार्ट प्रमाणे केवळ ॲमेझॉनच नाही फॉक्सवॅगन, टाटा, फ्लिपकार्ट, जिओ, रिलायन्स अशा विविध कंपन्यांच्या नावे कधी वर्धापन दिन आहे म्हणून, कधी दिवाळी आहे म्हणून अशा ‘फ्री’ गिफ्ट्सचे वाटप होत असल्याचे मेसेज सातत्याने येत असतात.

Source: Whatsapp


त्यातील लिंकवर क्लिक केल्यास काय होईल, जाणून घ्या सविस्तर पडताळणीमध्ये.

पडताळणी:

कोणत्याही कंपनीचे मेसेज असोत सर्वांचा हेतू आणि पद्धती एकसारखीच असते. Filpkart च्या नावे व्हायरल झालेल्या लिंकला उदाहरण म्हणून पाहूयात म्हणजे इतरही बाबी आपल्या सहज लक्षात येतील.

तुमच्याकडे तशा प्रकारचा कुणा ओळखीच्या व्यक्ती अथवा ग्रुप द्वारे मेसेज येतो. मग फ्री गिफ्ट’च्या आमिषापायी व्हायरल मेसेजच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन होते. यात तुमची फ्री गिफ्ट मिळवण्यासाठीच्या सर्व्हेत निवड झाली म्हणून अभिनंदन केले जाते.
खाली तुमच्याविषयी वैयक्तिक माहिती विचारणारे प्रश्न असतात. यात योग्य तो पर्याय निवडल्यास नवा प्रश्न समोर येतो.

त्यानंतर शेवटी पुन्हा एकदा अभिनंदन करत तुम्ही अमुक अमुक गिफ्ट जिंकण्यास पात्र आहात असे म्हणत ते मिळवण्यासाठी ५ व्हॉट्सऍप ग्रुप्स आणि २० वैयक्तिक नंबर्सवर त्यांनी दिलेली लिंक पाठवा असे सांगितले जाते. आपण त्या सर्व लोकांना या लिंक्स पाठवत राहतो आणि सरतेशेवटी कसलंही गिफ्ट आपल्या पर्यंत पोहचत नाही.

पोहचणार तरी कसं? ती वेबसाईट फ्लिपकार्ट, ॲमेझॉनच, फॉक्सवॅगन, टाटा, जिओ, रिलायन्स अशा कंपन्यांची अधिकृत वेबसाईट नसते. यातून केवळ तुमची वैयक्तिक माहिती चोरण्याचा डाव असतो. या खेळीत आपण स्वतःची तर माहिती देऊन बसतोच सोबतच आपण इतरांना लिंक्स पाठवून त्यांचीही माहिती देण्यास त्यांना परावृत्त करतो.

ज्यावेळी आपण आपल्या व्हॉट्सऍपवरून त्या लिंकवर क्लिक केलेलं असतं तेव्हाच आपल्या व्हॉट्सऍपला जोडलेली आपली माहिती त्यांच्यापर्यंत पोहचलेली असते. ही अशी माहिती गोळा करून ते विविध टेलिमार्केटिंग कंपन्यांना किंवा स्कॅम-फ्रॉड करणाऱ्या टोळीला विकतात. म्हणूनच आपल्याला सातत्याने नको असलेले कॉल येत असतात.

Source: Whatsapp

हे असे मेसेज फ्रॉड असल्याचे कसे ओळखावे?

जेव्हा आपणास कुणाकडून अशा प्रकारच्या फ्री गिफ्ट्सची लिंक येते तेव्हा त्यात वरच्या भागातील नव्हे तर खाली निळ्या रंगातील मूळ लिंककडे लक्षपूर्वक पहावे. यात असणारी वेबसाईट मूळ कंपनीची नसून भलतीच असल्याचे आपणास जाणवेल.

जसे की खालील मेसेजमध्ये वरच्या भागात www.flipkart.com अशी वेबसाईट दिसत असली तरीही खाली jyfxgd.bar/flipkarttest/tb / yours-offers.xyz/fks-mo/# अशी काहीतरी उलटसुलट अक्षरांची वेबसाईट दिसतेय. ही फ्लिपकार्टची अधिकृत वेबसाईट नाही.

Source: Whatsapp

हे कमेंट फ्रॉड असल्याचे कसे ओळखावे?

जर चुकून लिंकवर क्लिक केले तर त्यातही वरच्या बाजूला आपणास ती वेबसाईट पहायला मिळेल. याहून महत्वाचे म्हणजे वेबसाईटवर इतर ठिकाणी कुठेही क्लिक करून पाहिल्यास क्लिक होणार नाही. कारण ती खरी वेबसाईट नसते.
खाली स्क्रोल केल्यानंतर काही कमेंट्स पहायला मिळतील. या कमेंट्स आपण कधीही ती लिंक ओपन करून पहाल तेव्हा आहे तशाच दिसतील. ती संख्या वाढणाही नाही ना कमी होईल. त्यातील कुठल्याही कमेंटला लाईक करण्याचा किंवा त्यास रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला तरीही आपण ते करू शकणार नाही. या कमेंट्स केवळ आपला विश्वास वाढवण्यासाठी असतात.


Source: Whatsapp

व्हायरल लिंकमधील डोमेन आयडी म्हणजे जसे की ॲमेझॉनच्या मेसेज (amazon 30th anniversary free gifts) मधील लिंकचा डोमेन publicfloural.top एवढेच क्रोम ब्राउजरमध्ये टाईप करून इंटर कराल तर सदर साईट फर्जी असण्याची शक्यता वर्तवली जाते. यामध्ये त्यांनी ही वेबसाईट ‘फिशिंग साईट’ असल्याचे म्हंटले आहे. खाली फिशिंग म्हणजे काय सांगताना, ती साईट तुमचा पासवर्ड, क्रेडीट कार्ड डीटेल्स इत्यादी वैयक्तिक माहिती चोरू शकते असे लिहिले आहे.

वस्तुस्थिती:

अर्थातच, वस्तुस्थिती हीच आहे की कोणत्याही नामांकित कंपन्या अशा कुठल्याही प्रकारे विनाकारण फ्री गिफ्ट्स वाटत नाहीत. अशा काही ऑफर्स असतील तर त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरच असतात. कुठल्याही व्हायरल लिंक्सवर क्लिक करून आपण आपली वैयक्तिक, कौटुंबिक आणि पैशांविषयीची माहिती धोक्यात आणत आहात.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने