Top News

संविधान उद्देशिका 'आदिम माडिया' भाषेत #chandrapur #gadchiroli


सामाजिक कार्यकर्त्यांचा स्तुत्य उपक्रम


गडचिरोली:- गडचिरोलीतील नक्षलप्रभावित अतिदुर्गम भामरागड, एटापल्ली, अहेरी, धानोरा व छत्तीसगड सिमावर्ती भागात आदिम माडिया समाज आहे. त्यांची स्वतंत्र बोलीभाषा, संस्कृती आहे. देशभरातील ७५ व राज्यातील एकूण ३ आदिम समुदायांपैकी जल-जंगल-जमीनीवर उपजिविका करणारा हा एक समुदाय. मुलभूत गरजांचीच स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतरही पुर्तता न होवू शकणा-या या भागात 'भारतीय संविधान' खरोखरच पोहोचले आहे काय? मागील वर्षी 'पाथ' संस्थेने एक सर्वेक्षण केले, त्यात ९४% लोकांनी 'संविधान' हा शब्दच ऐकला नाही, हे धक्कादायक वास्तव पुढे आले होते.

संविधानाचे पाईक म्हणून या भागात संविधान जनजागृतीचे प्रयत्न गरजेचे आहे; त्याचाच एक भाग म्हणून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे स्थानिक आदिम माडिया भाषेत माडिया समाजातील पहिले वकिल ॲड. लालसू नोगोटी, सामाजिक कार्यकर्ता चिन्ना महाका व अविनाश पोईनकर.. या तिघांनी भाषांतर/अनुवाद केलेला आहे. संविधान तळागाळात-घराघरात पोहोचवणं आपली नैतिक जबाबदारी आहे असे मत अविनाश पोईनकर यांनी मांडले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने