Top News

1 लाख 29 हजार रुपयांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त #chandrapur #gadchiroli



चंद्रपूर:- राज्यात सुगंधित तंबाखू वर प्रतिबंध असतांनाही चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधक सुगंधित तंबाखू ची विक्री व वापर खुलेआम सुरू आहे.

अश्यातच दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी सावली पोलिसांनी सुगंधीत तंबाखू वर मोठी कारवाई केली आहे यात 1,29,000 रुपयांचा सुगंधीत तंबाखू जप्त करण्यात आला असून एक आरोपीला अटक करण्यात आली आहे यातील मुख्य सूत्रधार गडचिरोली येथील व्यापारी गुप्ता यांचा तपास सुरू आहे.

सावली तालुक्यातील वेहाड (बु) येथे एका भाड्याच्या रूम मध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाखू साठवून ठेवले असल्याची गोपनीय माहिती सावली पोलिसांना प्राप्त होतात सावली पोलिसांनी छापा टाकला असता त्याठिकाणी मजा, ईगल चे डब्बे, खुला सुगंधी तंबाखू व तीन तीन किलोचे सिल्वर पन्नी असे एकूण 18 पाकीट आढळून आले.
यात आरोपी राहुल खोब्रागडे राहणार वेहाड (बु) याला अटक करण्यात आली असून गडचिरोली येथील व्यावसायिक गुप्ता यांचा तपास सुरू आहे. आरोपींवर अन्नसुरक्षा मानद कायद्यांतर्गत भांदवि 328, 188, 272 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सावली पोलीस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने