Top News

निसर्गाचा अनोखा चमत्कार; काही दिवसांपासून सतत वाहणारा बोअरवेल बघितलाय का? #Chandrapur #pombhurna #Borewell


माहिती व व्हिडिओ पहा; कुठला आहे हा बोअरवेल


पोंभुर्णा:- सध्या उन्हाळा सुरू असल्याने पाण्याची पातळी खाली गेली आहे. अनेक ठिकाणचे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटले आहेत. मात्र या स्थितीत निसर्गाचा एक आगळावेगळा चमत्कार बघायला मिळत आहे. पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार जवळील वनविभाग अंतर्गत पांढरी माती देवस्थान येथे नर्सळी जवळ १ एप्रिलला बोर मारले असता त्या बोरमधून सतत पाणी वाहत आहे. ३-४ दिवस लोटून सुद्धा बोअरवेल वाहत असल्याने कुतूहलाचा विषय ठरला आहे. परंतु हा बोअरवेल पुन्हा किती दिवस वाहत राहणार हे पहावे लागेल.

निसर्गाचा अनोखा चमत्कार

पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार परिसरातील जंगला नुकताच १ एप्रिलला वनविभाग अंतर्गत पांढरी माती देवस्थान येथे नर्सळी जवळ १ एप्रिलला बोर मारले असता त्या बोरमधून सतत पाणी वाहत आहे. ३-४ दिवस लोटून सुद्धा बोअरवेल वाहत असल्याने कुतूहलाचा विषय ठरला आहे.

वन्यजीवांची भागविणार तृष्णा

वनविभाग बोअरवेलमधून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाहाचा वापर आता वनविभागाने वन्यजीवांची तृष्णा भागविण्यासाठी केला जाऊ शकतो. या जंगल परिसरातील वाघ, तृष्णभक्षक प्राणी, पक्षी या पाण्यावर तृष्णा भागवणार आहे. निसर्गाचा हा अनोखा चमत्कार आहे. एकीकडे पाण्याचे स्रोत आटत असताना उमरी पोतदार येथील बोअरवेलचा झरा ओसंडून वाहत आहे.

हे आहे वैज्ञानिक कारण

पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी या वैज्ञानीक घटनेवर प्रकाश टाकला. वैज्ञानिक भाषेत याला आर्टिजन वेल असे म्हणतात. एखाद्या जमिनीच्या भूभागामध्ये जर कठीण खडक असेल जिथले पाणी खाली झिरपत नाही. त्यावरचा खडक हा जर वाळूचा खडक असेल ज्याला सेडिमेन्टेड रॉक म्हणतात. जर त्याचा आकार एखाद्या कपबशीसारखा असेल तर तिथे पाणी गोळा होते, आणि त्याचा दाब हा उच्च असतो. अशा ठिकाणी जर कूपनलिका किंवा बोअरवेल असेल तर अशा ठिकाणी पाणी सतत वाहत असते. असे पर्यावरण अभ्यासक प्रा. चोपणे यांनी आधार न्युज नेटवर्कशी बोलताना सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने