चंद्रपूर जिल्ह्यात 5 किलो गांजा जप्त; 4 आरोपींना अटक #Marijuana #arrested #chandrapur #police


चंद्रपूर:- भद्रावती शहरातील मुख्य चौकात अवैध गांजाची विक्री होते असल्याची गोपनीय माहिती भद्रावती पोलीसांना प्राप्त होताच पोलीस पथकाने छापा टाकला असता 4 इसमांना अटक करीत 5 किलो गांजा, दोन दुचाकी व मोबाईल असा एकूण 1,37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भद्रावती शहरातील चंद्रपूर भद्रावती मुख्य मार्गावरील पेट्रोल पंप जवळ गांजाची विक्री करण्यासाठी चार आरोपी आले असल्याची माहिती दिनांक 3 एप्रिल रोजी मिळाली त्याआधारे भद्रावती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सपोनि सुधीर वर्मा, शशांक बद्दामवार, जगदीश झाडे, रोहित चिटगिरे, आशिष गौरकार व मोनाली गारगोटे यांनी पथक तयार करून सापळा रचून कारवाई करण्यात आली.

यात आरोपी सौरभ दुर्वास कसारे, अदनान शेख, लोकेश मानकर व राहुल साखरे या चार आरोपींना अटक करण्यात आली असून 5 किलो प्रतिबंधीत अवैध गांजा, 2 मोटारसायकल व मोबाईल असा एकूण 1 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुढील तपास भद्रावती पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात भद्रावती पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत