हडस्तीला आज जाहीर कीर्तन; हनुमान जयंती निमित्त भाविकांची असणार गर्दी
बल्लारपूर:- हनुमान जयंतीनिमित्त सत्यपाल महाराजांचे पट्ट शिष्य नयनपाल शिंदोलकर महाराज यांचे जाहीर कीर्तनाचे आयोजन श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, हनुमान मंदिर समिती व समस्त गावकरी मंडळी हडस्ती च्या वतीने स्थानिक हनुमान मंदिर परिसर हडस्ती येथे घेण्यात येणार आहे.
दरम्यान दि. ५ एप्रिलला सायंकाळी ६:०० वाजता घटस्थापना व त्यानंतर सायंकाळी ७ ते १० वाजेवपर्यंत मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनात क्रांती घडवणारे राष्ट्रीय सप्तखंजिरी वादक प्रबोधनकार तथा विद्रोही लेखक कवी सत्यपाल महाराजांचे पट्ट शिष्य नयनपाल शिंदोलकर महाराज यांचे जाहीर कीर्तनाचा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधव व इतर गुरुदेव अनुयायी उपस्थित राहण्याची शक्यता समितीने वर्तवली आहे. त्यामुळे क्रांतिकारी कीर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांनी हडस्ती येथे उपस्थित रहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे व दुसऱ्या दिवशी दिनांक ६ एप्रिल ला सकाळी १०-०० च्या सुमारास निघणाऱ्या पालखी सोहळ्यात व सायंकाळी ५-०० वा. होणाऱ्या महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सुद्धा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.