ट्रॅक्टरला बांधून मजूराला अमानुष मारहाण करणाऱ्या एकाच कुटूंबातील तिघांवर गुन्हे दाखल #chandrapur #bramhapuri #crime


ब्रम्हपुरी:- पत्नीकडे बघितल्याच्या संशयावरून एका कामगाराला ट्रॅक्टरच्या इंजिनला दोरखंडाने बांधून तीन व्यक्तींनी अमानुष मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला.

त्यांनतर ब्रम्हपूरी पोलिसांनी मारहाण करणारे आरोपी दिनेश काशिनाथ अवसरे, निलेश काशिनाथ अवसरे, गणेश काशिनाथ अवसरे या एकाच कुटूंबातील तिघांवर गुन्हे दाखल केले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी (दि. ३) एका व्यक्तीला ट्रॅक्टरला बांधून तीन व्यक्ती हाताने, बेल्टने अमानुष मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. व्हिडीओ समाजमाध्यामांवर व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका तरूण व्यक्तीला ट्रॅक्टरच्या इंजिनच्या समोरील भागाला दोरखंडाने बांधण्यात आले. त्यांनतर त्याला हाताने, बेल्टने मारहाण करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तसेच एका व्यक्तीच्या हाता कोयला असून त्याने मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अन्य एका व्यक्तीच्या हातात पेट्रोल अथवा डिझेलची कॅन दिसून येत आहे. त्या मजूरासोबत होणारा प्रकार भयावह असल्याने समाजमाध्यमांवर व्हायरल होताच नागरिकांमध्ये या घटनेचा प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला.


अनुचित घटना घडण्यापूर्वीच पोलिसांनी बेलगाव गाठले. आणि मजूर व आरोपींना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. बराचवेळ दोघांनाही तक्रार न केल्याने पोलिसांना गुन्हे दाखल करण्यातस विलंब झाला. परंतु समाजमाध्यांवर व्हायरल झालेलया व्हिडीओमुळे पोलिसांवर दबाव वाढला.

 कंत्राटदार जगताप यांनी तक्रार दाखल करताच आरोपी एकाच कुटूंबातील दिनेश काशिनाथ अवसरे, निलेश काशिनाथ अवसरे, गणेश काशिनाथ अवसरे या तिघांवर गुन्हे दाखल केले आहे. त्या मजुराला चामड्याच्या बेल्टने अमानुषपणे मारहाण केल्यानंतर, एका व्यक्तीजवळ असलेल्या धारदार कोयत्याने त्याला कपडे काढून मारहाण करण्याचा प्रयत्न होता, अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरिक्षक आंबोरे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत