दि. ३० मे ला होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी
https://www.adharnewsnetwork.com
Google ads.
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी व सिमेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर शहरात डॉ. विनोद डोणगावकर तहसीलदार कोरपना प्रवीण चिडे नायब तहसीलदार कोरपना यांच्या मार्गदर्शनात सोहेल अन्सारी तलाठी गडचांदूर चव्हाण मंडळ अधिकारी गडचांदूर तर्फे शासकीय योजना लोक भिमुक करून त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान तहसील कार्यालयात कोरपना तर्फे गडचांदूर शहरात ३० मे २०२३ ला सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथे आयोजित केलेला आहे. तालुक्यातील संपूर्ण नागरिकांनी या विविध शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
'शासन आपल्या दारी' या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
'शासन आपल्या दारी' उपक्रमाचा उद्देश सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा आहे. बर्याचदा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेकदा नागरिकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे राज्य सरकारने हा उपक्रम सुरू केला असून या माध्यमातून सरकारला थेट लोकांच्या दारात आणून प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.