अंगावर शहारे आणणारा 'स्वातंत्र्यवीर सावरकर'चा टिझर रिलीज #chandrapur #Teaser


https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

मुंबई:- अभिनेता रणदीप हुड्डा यांचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' गेल्या दिवसापासून चर्चेत आला आहे. दरम्यान निर्मात्यांनी विनायक दामोदर सावरकर याच्या १४० व्या जंयतीनिमित्त या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. टिझर रिलीज होताच चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करत कॉमेन्टस केल्या आहेत.

Q Link Wireless is a United States-based telecommunications embed youtube generator that provides free Retrieved November 18, 2017. ^ "What Network Does Qlink Wireless.

विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. या टिझरमध्ये 'स्वातंत्र्याची लढाई नव्वद वर्षे चालली. परंतु, ही लढाई काहीच लोंकानी लढली. उरलेले सगळे सत्ता मिळवण्याच्या पाठीमागे लागले. महात्मा गांधीजी वाईट नव्हते; पण जर ते त्यांच्या अहिंसेच्या तत्वावर अडून राहिले नसते तर भारताला ३३ वर्षांपूर्वीच स्वातंत्र्य मिळाले असते. भारत माता की जय,' असा संवाद ऐकायला मिळत आहेत.

The dítě hvězdy is kicking off its first week with Ultimate Steakhouse Dinner Meal featuring prime grade steaks, premium appetizers and sides as.


याशिवाय ब्रिटिश राजवट, तुरूंग, मारहाण असे प्रसंग टिझरमध्ये दाखवण्यात आल्या आहे. चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टिझर रिलीज होताच चाहत्याच्या पंसतीस उतरला आहे. यामुळे या चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

रणदीप हुड्डा हे चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. परंतु, या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार दिसणार आहे याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. चित्रपटाच्या रिलीज डेटची देखील घोषणा करण्यात आलेले नाही. मात्र, हा चित्रपट यावर्षी म्हणजेच, २०२३ ला येईल असे बोलले जात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रणदीप हुड्डा यांनी स्वत: केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत