Top News

सरदार पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची यशाची परंपरा कायम #chandrapur #SardarPatelmahavidyalayachandrapur


चंद्रपूर:- स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयाने एचएससी (HSC) बोर्ड परीक्षेत यावर्षी देखील घवघवीत यश संपादित केले आहे. कला, वाणिज्य, विज्ञान व व्होकेशनल (एमसीव्हीसी) या विभागात एकूण ६९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामध्ये कला शाखेचा निकाल ७२.६७ टक्के, वाणिज्य शाखा ८७.२१ टक्के, विज्ञान शाखा ९६.८० टक्के तर व्होकेशनल (एमसीव्हीसी) शाखेचा निकाल ८७.५० टक्के लागला. (HSC Board Exam Result Declared)

बारावीच्या निकालात चंद्रपूरची सानिका प्रथम

यावर्षी विज्ञान शाखेतून प्रथम मंजिरी प्रशांत चौधरी ८६ टक्के, द्वितीय क्रमांक पंकज रामसरे बावरे याने पटकावला. तृतीय शिवानी प्रशांत नंदनवार ७९.६७ टक्के, कला शाखेतून प्रथम गौरी वामन निकोडे ८२.५० टक्के, द्वितीय सेजल गजानन वरभे ८१ टक्के, तृतीय मोहित सहदेव निकोडे ७५.८३ टक्के, वाणिज्य शाखेतून प्रथम सानिका सुदेश झुलकंटीवार ९५.१७ टक्के घेऊन जिल्ह्यात प्रथम आली. द्वितीय मानसी रुपेशकुमार सोनी ९४.६७ टक्के, तृतीय संस्कृती महेंद्र पाल हिने ९१.५० टक्के गुण मिळविले. त्याचप्रमाणे एचएससी व्होकेशनल (एमसीव्हीसी) मधून प्रथम जितेंद्र यादव ६३.५० टक्के, पंकजा महेंद्र कपूर हिने ६३.१७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. (Success tradition of students of Sardar Patel College continues) 

बारावीत चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम आलेल्या सानिकाचा सत्कार
गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधा पोटदुखे, कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव माजी कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, सदस्य सगुनाताई तलांडी, राकेश पटेल, एस. के. रमजान, मनोहरराव तारकुंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सी. जे. खैरवार यांच्यासह प्राध्यापकांनी कौतुक केले आहे. विद्याथ्यांनी यशाचे श्रेय आई-वडिलांसह प्राध्यापकांना दिले आहे. #spcollegechandrapur #SardarPatelmahavidyalayachandrapur

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने