चेकबरांज महसूल हद्दीतून विना परवाना गौण खनिजाची वाहतूक

Bhairav Diwase
0
कारवाई करण्याची उपसरपंचाची मागणी
भद्रावती:- तालुक्यातील चेकबरांज महसूल हद्दीतील गौण खनिजाची विनापरवाना वाहतूक सुरू असून ही वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी चेकबरांज ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजू डोंगे यांनी एका निवेदनाद्वारे भद्रावती तहसीलदारांकडे केली आहे.
      डोंगे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, गेल्या काही महिन्यांपासून चेकबरांज महसूल हद्दीतून एम्टा खाणीतील ओ. बी. रेती व मुरूम यांची अवैधरित्या ट्रॅक्टर व ट्रक या वाहनांद्वारे सर्रास वाहतूक केल्या जात आहे. सदर महसूली क्षेत्र हे कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन च्या नावाने वर्ग झाले आहे. अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडे कुठल्याही प्रकारची गौण खनिज उत्खननाची परवानगी नाही. तरीदेखील गौण खनिजांची दिवस-रात्र वाहतूक सुरू आहे.

 सदर वाहतूक करणारी वाहने ही चेकबरांज गावातून जात असताना अतिशय वेगवान गतीने जात असतात. त्यामुळे चेकबरांज गावातील नागरिकांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. सदर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर व त्यांच्या मालकांवर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी तहसीलदार भद्रावती यांना निवेदनातून करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)