रक्तदुत महेश श्रीगिरीवार ने केला रक्तदान करून वाढदिवस साजरा

Bhairav Diwase
0
पोंभुर्णा:- १६ जून रोजी युवासेना शहर प्रमुख महेश श्रीगिरीवार याचा वाढदिवस होता. महेश हा नेहमी समाज कार्य करून वयाच्या १८ व्या वयापासून आतापर्यंत तो १७-१८- वेळा रक्तदान करून कमी वयात विक्रम केला. रक्तदान हेच श्रेष्ठदान, रुग्णाची सेवा हीच खरी समाजसेवा बोलत महेश स्वतः रक्तदान करीतच तो नेहमीच रुग्णांना रक्ताची आवश्यकता पडली तर तो तात्काळ उपलब्ध करून रुग्णांना मदत करतो त्यामुळे त्याची ओळख तालुक्यात रक्तदुत अशी पडली आहे. 

महेश ने वाढदिवसाचे औचित्य साधत मित्रांसह रक्तदान करण्याचे ठरवले व महेश श्रिगीरीवार सह, नोकेश कपाट,आशिष कावडे, साहिल नैताम, सूरज कावडे,सुधीर ढोले, चंदन कपाट, अक्षय सोनुले,अंकुश गव्हारे, महेश धोडरे, राकेश मोगरकर,आकाश गज्जलवार व आदीनी जिल्हा रुग्णालयात चंद्रपूर येथील ब्लड बँक येथे रक्तदान करून तेथे वाढदिवस साजरा केला.
 सामाजिक, शैक्षणिक,सोशल मिडिया स्तरातून महेश श्रीगिरीवार याची या अनोख्या वाढदिवसाचे कौतुक करत अनेकांनी शुभेच्छा दिल्या. पत्रकार बंधू भगिनीने देखील महेश ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कौतुक करत शुभेच्छा दिले व युवकांनी महेश चा आदर्श घेण्याचे आवाहन अनेकांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)