टेकामांडवा येथील कॉग्रेसच्या सरपंच सौ. शुभांगी राऊत यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश chandrapur ballarpur Rajura


माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या नेतृत्वात केला पक्ष प्रवेश

राजुरा:- देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी,भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डाजी कुशल नेतृत्वात तसेच महाराष्टाचे उपमुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस,भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावणकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री मा.सुधिरभाऊ मुनगंटीवार व राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष मा.हंसराजजी अहीर यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून तसेच राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय भाऊ धोटे यांच्या नेतृत्वाखाली व भाजपाचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष हरिशजी शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत,

भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय बल्लारपूर येथे जिवती तालुक्यातील टेकामांडवा येथिल कॉग्रेसच्या सरपंच सौ शुभांगी गुरुदेव राऊत तसेच गुरुदेव राऊत यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.यावेळी पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी यांचे पक्षात दुपट्टा टाकून स्वागत केले,यावेळी भाजपा तालुका महामंत्री सुरेश केंद्रे,गडचादुर येथील माजी नगर सेवक निलेश ताजणे,बालाजी भुते,शिवाजी पल्लेवाड,अकुंश आमनर,विठ्ठल पोरडवार उपस्थितीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या