पोंभुर्णा:- शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणावर व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत साहारे यांच्या मार्गदर्शनात व तालुकाप्रमुख आशिष कावटवार यांच्या नेतृत्वात युवासेना प्रमुख महेश श्रिगिरीवार, नगरसेवक बालाजी मेश्राम, माजी सरपंच जिवनदास गेडाम, विकास शेडमाके यांच्या उपस्थितीत देवाडा बु. येथ असंख्य युवकांचा पक्ष प्रवेश झाला.
यात अक्षय झाडे, नितेश भिवकर, गिरीधर बद्न, सारंगधर मिसार, हिराजी गोहणे, दिनेश बदन, मुखरू राजुरकर, बालाजी झाडे, किशोर तिवाडे, अथर्व झाडे कालिदास बदल, बालू झाडे,किशोर तिवाडे,संजय बदन,चरण झाडे, हिरामण भिवनकर,सुरेश बदन,शीतल बदन,कैलास घोटेकर,भाऊराव भिवनकर,भाऊराव बदन आत्माराम बदन,भाऊराव वाढरे,गंगाधर घोडे, रामदास मिसार, धूर्वास तिवाडे,शामराव चुदरी,सुनील बदन, हेमंत भिवनकर,मनोहर राजुरकर, घमश्याम घोटेकर,साजन बदन, धूर्वशे तिवाडे,सुनील बदन व आदी युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी मार्गदर्शन करताना आपला पक्ष संघटना कशी मजबूत झाली पाहिजे यासाठी जिल्हाप्रमुख संदिपजी गिऱ्हे यांनी अहोरात्र मेहनत घेत आहे. सामाजिक कामात नेहमी सदैव असतात तसेच आपण सुध्दा पुढाकार घेऊन त्यांच्या या मेहनतीला आपल्याला साथ द्यायची आहे असे तालुका प्रमुख कावटवार यांनी मार्गदर्शन केले.
युवसेना जिल्हाप्रमुख यांनी युवकांचे राष्ट्राच्या उन्नती मध्ये काय स्थान आहे? हे सर्व युवकांना पटवून देऊन शिवसेना वाढी मध्ये युवकांचा मोठा हातभार कसा लागेल याचे देखील यथोचित्त केले. यावेळी मोठ्या संख्येत युवक उपस्थित होते.